- संतोष येलकर
अकोला: जिल्ह्यातील खारपाणपट्ट्यातील बारुला विभागात गावांमध्ये दुष्काळी परिस्थितीत १५ ते २० दिवस पिण्याचे पाणी मिळत नाही. कपाशी व तूर पिकाचे उत्पादन बुडाले असून, हरभऱ्याचे पीकही कोमेजू लागले आहे. त्यामुळे हिवाळ्यातच बारुल्यात उलंगवाडी झाल्याने, शेतकरी चिंतेत सापडल्याचे वास्तव आहे.पावसातील खंड, जमिनीतील आर्द्रतेचे कमी प्रमाण आणि त्यामुळे खरीप पिकांच्या उत्पादनात घट झाल्याने, जिल्ह्यातील अकोला, बाळापूर, बार्शीटाकळी, तेल्हारा व मूर्तिजापूर या पाच तालुक्यात शासनामार्फत दुष्काळी परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे. जिल्ह्यातील खारपाणपट्ट्यातील बारुला विभागातील गावांमध्ये १५ ते २० दिवस ग्रामस्थांना पिण्याचे पाणी मिळत नाही. नळांना पाणी आले तर १५ दिवस पाणी साठवून ठेवावे लागत आहे; मात्र १५ दिवस उलटून गेल्यानंतर पाणी मिळाले नाही तर, ग्रामस्थांना विकत पाणी घेऊन तहान भागवावी लागत आहे. तसेच उगवा, कासली, दोनवाडा व इतर गावातील ग्रामस्थांना विहीर व नाल्यातील पाण्यावर तहान भागवावी लागत असून, बैलबंडी, आॅटो, मोटारसायकल व सायकलवरून पिण्याचे पाणी भरले जात आहे. त्यामुळे खारपाणपट्ट्यातील बारुल्यात हिवाळ्यातच पाणीटंचाईचे चटके ग्रामस्थांना सहन करावे लागत आहेत. दुष्काळी परिस्थितीत नापिकीचा सामना शेतकºयांना सहन करावा लागत आहे. दरवर्षी एप्रिल अखेरपर्यंत कपाशीचा हंगाम चालतो; मात्र यावर्षी जमिनीत ओलावा नसल्याने डिसेंबरमध्ये कपाशीचा हंगाम संपण्याच्या मार्गावर असून, शेतातील पूर्णत: वाळलेल्या कपाशीची वखरणी शेतकºयांनी सुरू केली आहे. तुरीच्या झाडांना चार-पाच शेंगा लागल्या असून, शेंगामधील दाणेही भरले नसल्याने, तूर पिकाचे उत्पादनही शेतकºयांच्या हातून गेले आहे. रब्बी हंगामात पेरलेला हरभरा जमिनीत ओलावा नसल्याने कोमेजू लागला असल्याचे हरभºयाचे उत्पादनही बुडणार आहे. त्यामुळे हिवाळ्यातच पिकांची उलंगवाडी झाल्याने, खरपाणपट्ट्यातील बारुला विभागातील शेतकरी चिंतेत सापडला आहे.कपाशी, तूर व हरभरा पिकाची आहे परिस्थिती!दुष्काळी परिस्थितीत जमिनीत ओलावा नसल्याने, एकारी दोन ते तीन क्विंटल कपाशीचे उत्पादन झाले असून, तुरीला केवळ पानेच असून, तुरीच्या झाडाला चार ते पाच शेंगा लागल्या आहेत. त्यामध्येही दाणे भरले नसल्याने, तुरीच्या पिकाचे उत्पादन हातून गेले आहे. तर जमिनीत ओलावा नसल्याने, हरभरा कोमेजू लागल्याने, हरभरा पिकाचे उत्पादन बुडाल्याची परिस्थिती आहे, असे बारुला विभागातील शेतकºयांनी सांगितले.बारुल्यात हिवाळ्यातच उलंगवाडी !‘या’ गावांत पाण्यासाठी पायपीटपिण्याचे पाणी १५ ते २० दिवस मिळत नाही, त्यामुळे हिवाळ्यात ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करावी लागत असून, पिके हातून गेल्याने, नापिकीच्या स्थितीत शेतकरी संकटात सापडल्याची परिस्थिती आहे. असे वास्तव घुसरवाडी, म्हातोडी, कासली, दोनवाडा, उगवा, घुसर, आपातापा, आपोती, आखतवाडा, अनकवाडी इत्यादी गावांमध्ये सोमवारी आढळून आले.जलकुंभ ठरले बिनकामाचे!बारुला विभागातील गावांमध्ये खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत पाणीपुरवठा करण्यात येतो. गावांमध्ये पाणी वितरणासाठी गावागावात जलकुंभ बांधण्यात आले आहेत; मात्र एकाही जलकुंभात पाणी पोहोचत नसल्याने, या भागातील जलकुंभ बिनकामाचे ठरल्याची बाब समोर आली आहे.