गेल्या २२ वर्षांपासून नामदेवराव मो. राखोंडे गुरुजी यांनी पातुर शहरात धार्मिक, पारंपरिक व सामाजिक, सांस्कृतिक संदेश देणारे देखावे साकारत असून त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना व मंडळाला महाराष्ट्र शासनाचा तालुका व जिल्हास्तरीय गणेशोत्सव सजावट पुरस्कार मिळाले आहे. ही परंपरा त्यांचे मुले सागर राखोंडे व विशाल राखोंडे यांनी चालू ठेवली आहे. गेला ९ वर्षांपासून प्रतिष्ठान व गणेशोत्सवाची नोंदणी करून १० दिवसीय युवा महोत्सव व सांस्कृतिक व सामाजिक कार्य तसेच विविध उपक्रम राबवित आहेत.
फोटो:
महापुरुषांना समर्पित देखावा
यावर्षीचा अमृत महोत्सवाचा देखावा हा भारत देशाला स्वतंत्र करण्यासाठी बलिदान देणारे वीर सेनानी व थोर महात्मे व महिला व पुरुषांना समर्पित केला असून सदर देखावा हा सागर राखोंडे, विशाल राखोंडे, पल्लवी मांडवगणे, शुभांगी उमाळे व ज्योती राखोंडे व राखोंडे परिवारांच्या संकल्पनेतून तयार केला आहे.