अकोला: शेतकऱ्यांच्या मदतीला धावून जाण्याचा उपक्रम अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीने अविरत जोपासला असून, मंगळवार, १२ फेब्रुवारी रोजी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना मदतीचा हात देतच उच्च शिक्षण घेणाºया शेतकºयांच्या ७५ पाल्यांना प्रत्येकी १० हजार रुपये शिष्यवृतीचे वितरण सभापती शिरीष धोत्रे व सहकारी संचालकांच्या हस्ते करण्यात आले.लोकनेते वसंतराव धोत्रे यार्डात कृषी महोत्सवासोबत गायवाडा सभागृहात शेतकºयांच्या पाल्यांना शिष्यवृत्ती व शेतकºयांना ट्रॅक्टरसाठी अर्थसाहाय्य वितरणाचा सोहळा पार पडला. त्यावेळी ७५ पाल्यांना प्रत्येकी १० हजार रुपये शिष्यवृत्ती वितरित करण्यात येऊन पाच कास्तकारांना ट्रॅक्टरसाठी अर्थसाहाय्य प्रदान करण्यात आले. उच्च शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांमध्ये अभियांत्रिकी, पदवी, पदव्युत्तर, वैद्यकीय अभ्याक्रमात एमबीबीएस, एमएस, बीडीएस, बीएचएमएस, बीएएमएस, बीफार्म, एमएससीच्या विद्यार्थी, विद्यार्थिनींचा समावेश होता.