वाडेगाव(अकोला): भरधाव स्कुलबस ट्रकवर आदळल्याची घटना ८ फेब्रुवारी रोजी पातूर ते वाडेगाव रस्त्यावर घडली. या अपघात तीन विद्यार्थी जखमी झाले आहेत. सुदैवाने बसमध्ये असलेल्या ४० विद्यार्थ्यांचे प्राण वाचले. अपघातानंतर स्कुलबसच्या चालकाने घटनास्थळावरून पळ काढला.वाडेगाव येथील गुरूकुल इंग्लीश स्कुलची बस विद्यार्थ्यांना घेउन पातूरकडे येत होती. दरम्यान, चालकाचे नियंत्रण सुटल्याने पातूर ते वाडेगाव रस्त्यावरील धाब्याजवळ ही बस ट्रकवर आदळली. या अपघातात बसमधील तीन विद्यार्थी जखमी झाले. तसेच पाच ते सहा विद्यार्थी किरकोळ जखमी झाले. जखमींमध्ये अमन अनिल साबे( १२),प्रद्युमन माकोडे (१२),संदिप महादेव साबे (१२) तिघांचा समावेश असून त्यांना तातडीने वाडेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. तेथे प्रथमोपचार केल्यानंतर तिन्ही विद्यार्थ्यांना सर्वोपचार रुग्णालय अकोला येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. या बसमध्ये परिसरातील ४० विद्यार्थी प्रवास करीत होते. सुदैवाने अपघात मोठा नसल्याने या विद्यार्थ्यांचे प्राण वाचले. घटनास्थळावरून स्कुलबसच्या चालकाने पळ काढला. अपघातानंतर बसमधील विद्यार्थी घाबरले होते. या रस्त्याने जाणाऱ्या ग्रामस्थांनी अपघातग्रस्त बसमधून विद्यार्थ्यांना सुखरूप बाहेर काढून त्यांना दिलासा दिला. तसेच जखमी विद्यार्थ्यांना तातडीने वाडेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारार्थ हलवले.या अपघातात बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. वाडेगाव पोलीस चौकीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव पाटील व त्यांच्या सहकाºयांनी घटनास्थळी जाऊन केला.वृत्त लिहेपर्यत पोलीस चौकी मध्ये कोणताही गुन्हा दखल झाला नव्हता. (वार्ताहर)