शहरं
Join us  
Trending Stories
1
नव्या सरकारमध्ये श्रीकांत शिंदे होणार उपमुख्यमंत्री?; प्रस्तावावर भाजपाही सकारात्मक
2
Maharashtra Politics : महाविकास आघाडीच्या प्रयोगाचा सर्वाधिक तोटा कोणाला झाला? काय सांगते आकडेवारी
3
धावत्या ट्रेनमधून पडला मुलगा, पाठोपाठ घाबरलेल्या आईने मुलीसह खाली मारली उडी
4
रेल्वेतील चादरी आणि ब्लँकेट किती दिवसांनी धुतात, रेल्वे मंत्र्यांनी काय दिले उत्तर?
5
माउलींनी संजीवन समाधी घेतली तेव्हा विठ्ठल रखुमाईलाही अश्रु अनावर झाले, तो आजचाच दिवस!
6
PPF ची जादू : ₹१.७४ कोटी व्याजातून कमावाल; मॅच्युरिटीवर मिळतील ₹२.२६ कोटी, पाहा सोपा फॉर्म्युला
7
"तू जितका शिकून आलास..."; पत्नीच्या उपचारासाठी आलेले IPS डॉक्टरवर संतापले, दिली धमकी
8
खांदे पालट झाल्यावरही श्रेयस-अजिंक्य यांच्यात गोडी; पुणेकर ऋतुराज-राहुलवर भारी पडली मुंबईकर जोडी
9
Maharashtra Politics : राजकीय घडामोडींना वेग !महायुतीतील बड्या नेत्यांची दिल्लीत बैठक होणार;शिंदे दिल्लीला जाणार
10
बावीस वर्षांचे कोवळे वय, तरी इहलोकीचे अवतार कार्य संपवून माउलींनी परलोकीची धरली वाट!
11
"तिने याआधीही ४-५ वेळा...", जिया खान आत्महत्या प्रकरणावर सूरज पांचोलीच्या आईची प्रतिक्रिया
12
पाकिस्तानात जोरदार संघर्ष, ७ दिवसांत १०० मृत्यू; कुर्रम जिल्ह्यात हिंसाचार पेटला
13
महाराष्ट्रात धक्कातंत्र? मुख्यमंत्री भाजपचाच होणार, पण नक्की कोणाला संधी?; पक्षातील ५ नावं स्पर्धेत
14
Cheetah Kuno: कुनोतून आली वाईट बातमी! चित्त्याच्या दोन पिलांचा मृत्यू, मृतदेहांवर जखमा 
15
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आजचा दिवस लाभदायी, धनलाभ संभवतो!
16
मुख्यमंत्रिपदावर आज दिल्लीत निर्णय; फडणवीसांना पसंती, मात्र समर्थकांना धक्कातंत्राची भीती
17
Stock Market Updates: सेन्सेक्स-निफ्टीची फ्लॅट सुरुवात; मिडकॅप-स्मॉलकॅप शेअर्समध्ये तेजी; ऑटो शेअर्सवर दबाव
18
महायुतीच्या नव्या सरकारमध्ये गृहमंत्री कोण असेल? अजित पवार, एकनाथ शिंदे की....  
19
जम्मू-काश्मिरच्या खोऱ्यात दहशतवाद्यांचा खात्मा होणार; NSG कमांडो कायमस्वरूपी तैनात करण्यास गृह मंत्रालयाची मंजुरी
20
देशातील नंबर १ रेस्तराँ कोणतं? Anand  Mahindra यांचीही आहे गुंतवणूक; या यादीत घातलाय धुमाकूळ

विज्ञान मंच प्रशिक्षण शिबिराचा समारोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2019 12:28 PM

अकोला: शाळांमध्ये सर्व सुविधा आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू मानुन त्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याची गरज आहे. सध्या जिल्ह्याचा शिक्षणस्तर उंचावत असून जिल्ह्यातील चार शाळांना आंतरराष्ट्रीय शाळा म्हणून मान्यता मिळाली आहे.

अकोला: शाळांमध्ये सर्व सुविधा आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू मानुन त्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याची गरज आहे. सध्या जिल्ह्याचा शिक्षणस्तर उंचावत असून जिल्ह्यातील चार शाळांना आंतरराष्ट्रीय शाळा म्हणून मान्यता मिळाली आहे. ही गौरवाची बाब आहे. असे प्रतिपादन जिल्हा शैक्षणिक गुणवत्ता व सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्थेचे प्राचार्य डॉ. प्रकाश जाधव यांनी केले.राज्य विज्ञान शिक्षण संस्था, शिक्षणाधिकारी माध्यमिक, अकोला एज्युकेशन सोसायटीच्यावतीने न्यू इंग्लिश हायस्कूलच्या सभागृहात १४ मार्च रोजी झालेल्या विज्ञान मंच शिबिराच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. भाऊसाहेब मांडवगणे होते. प्रमुख अतिथी म्हणून स्कूल आॅफ स्कॉलर्सच्या प्राचार्य मनिषा उंबरकर, प्राचार्य माधव मुन्शी, प्रा.डॉ. रविंद्र भास्कर, शशीकांत बांगर होते. दोन दिवसीय शिबिरात विज्ञान मंच परीक्षेतून पात्र ठरलेल्या १४0 पैकी १0८, ज्ञान विज्ञान परीक्षेत पात्र ७१ पैकी ४0 विद्यार्थी आणि पालक, शिक्षक अशा एकूण २५८ शिबिरार्थींनी सहभाग घेतला. १३ व १४ मार्च रोजी न्यू इंग्लिश व आरएलटी विज्ञान महाविद्यालयात झालेल्या शिबिरात प्रा. संजय देव्हळे, हेमंत ओझरकर, अमोल सावंत, संदीप वाघळकर, तृप्ती देशपांडे, आशिष गावंडे, ओरा चक्रे, धम्मदीप इंगळे आदींनी वैज्ञानिक विषयांवर मार्गदर्शन केले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी विश्वास जढाळ, सुनील वावगे, मुरलीधर थोरात, एस.बी. जाधव, नितीन तिवारी, सचिन ताडे, विजय पजई, पंकज जोशी, आशिष कुळकर्णी, प्रतापसिंह चौहान, संजय जोशी, जयंत जोशी, विलास कुळकर्णी, विशाल लाखपुरे यांनी प्रयत्न केले. संचालन प्राचार्य माधव मुन्शी, किरण चव्हाण यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. डॉ. रवींद्र भास्कर यांनी मानले. (प्रतिनिधी) 

 

टॅग्स :Akolaअकोलाscienceविज्ञान