शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Assembly Election Result 2024: एकनाथ शिंदे आज राजीनामा देण्याची शक्यता; पुढील मुख्यमंत्री कोण? चर्चांना उधाण
2
मुख्यमंत्रि‍पदावरून नाराज असल्याची चर्चा; आमदारांबाबत एकनाथ शिंदेंनी उचललं महत्त्वाचं पाऊल
3
चांगल्या कामासाठी मराठी माणसं एकत्र येणं चांगलेच; आमदार महेश सावंत यांचं विधान
4
मुख्यमंत्रि‍पदासाठी शिवसेना नेते आग्रही, पण शिंदेंचा कार्यकर्त्यांना महत्त्वाचा मेसेज; म्हणाले...
5
LIC नं सप्टेंबर तिमाहित केली ३८००० कोटींच्या शेअर्सची विक्री, तुमच्याकडे आहेत का ‘हे’ स्टॉक्स?
6
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची पिछेहाट, राज्यातील या २३ जिल्ह्यांत फोडता आला नाही भोपळा
7
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक व व्यावसायिकदृष्टया फायदेशीर दिवस
8
वॉरेन बफेट यांनी आपला उत्तराधिकारी ठरवला, दान केले १.१ अरब अमेरिकी डॉलरचे शेअर
9
PAN 2.0 प्रोजेक्ट काय आहे? खर्च होणार १४३५ कोटी रुपये; तुमच्या पॅन कार्डाचं काय होणार? जाणून घ्या
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: भाजप २६.७७% मतांसह राज्यात नंबर वन; मविआत मतांमध्ये कोणता पक्ष ठरला सरस?
11
भारतानं एकाच दिवसात ६४ कोटी मते मोजली; इलॉन मस्क अचंबित, अमेरिकेत अद्यापही मतमोजणी सुरूच
12
Maharashtra Assembly Election Result 2024: देवेंद्र फडणवीस, अमित शाहांची बैठक टळली; एकनाथ शिंदे-अजित पवार आज दिल्लीला जाणार
13
‘खरी शिवसेना कुणाची?’ याचा फैसला शेवटी झालाच! जे कुणाला जमलं नाही ते शिंदेंनी केलं
14
संविधान फक्त ‘नॅरेटिव्ह’पुरते?; संसद सभागृहातील गदारोळ हा अंतर्विरोध क्लेशकारक
15
आंबेडकरी विचारांची धार व धाक कुणी गमावला?; महाराष्ट्राचे, देशाचे राजकारण आता...
16
समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा महिनाभरात खुला; एमएसआरडीसीकडून कामांचा धडाका
17
साडेतीन हजार मालमत्ता होणार जप्त; कर न भरल्याने मुंबई महापालिकेची मोठी कारवाई
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: महायुतीत न जाता भाजपसोबत जाणे ही चूक; राज ठाकरेंसमोर पराभूत उमेदवारांची नाराजी
19
फेअर प्ले आयपीएलप्रकरणी मुंबई, ठाण्यासह  २१९ कोटींची मालमत्ता ईडीने केली जप्त
20
निवडणूक संपताच KDMC तील २ हजार कुटुंबांचे वास्तव्य धोक्यात; सामान्य बुडाले, बिल्डर मोकाट

स्क्रब टायफसची दहशत; आरोग्य यंत्रणा ‘हाय अलर्ट’वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2018 12:40 PM

अकोला : जिल्ह्यात कोठेही रुग्ण आढळल्याची सूचना मिळाल्यावर तीन तासांत त्या भागात जाऊन प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे निर्देश असल्याने जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा ‘हाय अलर्ट’वर ठेवण्यात आली आहे

ठळक मुद्देअकोल्यातील शिवाजी पार्क भागातील एका २८ वर्षीय तरुणाला या आजाराची लागण झाली. शिवाजी पार्क या भागात घरोघरी सर्वेक्षण करण्यात आले, तसेच फवारणी करण्यात आली.नागपूर व गडचिरोली जिल्ह्यात पाच जणांचा बळी घेतल्यानंतर या आजाराची दहशत पसरली आहे.

अकोला : शहरातील एका तरुणाला स्क्रब टायफस या कीटकजन्य आजाराची लागण झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतरआरोग्य विभाग खडबडून जागा झाला आहे. जिल्ह्यात कोठेही रुग्ण आढळल्याची सूचना मिळाल्यावर तीन तासांत त्या भागात जाऊन प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे निर्देश असल्याने जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा ‘हाय अलर्ट’वर ठेवण्यात आली आहे.स्क्रब टायफस हा एक कीटकजन्य आजार असून, ‘चिगर माइट्स’ कीटकाच्या चावल्याने हा आजार होतो. या आजाराची लक्षणे चिकून गुनियासारखी असून, हा आजार जलद गतीने वाढणारा आहे. योग्य वेळात निदान झाले नाही, तर ४० ते ५० टक्के मृत्यूची शक्यता असते. नागपूर व गडचिरोली जिल्ह्यात पाच जणांचा बळी घेतल्यानंतर या आजाराची दहशत पसरली आहे. अकोल्यातील शिवाजी पार्क भागातील एका २८ वर्षीय तरुणाला या आजाराची लागण झाली असून, त्याच्यावर नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार करण्यात आले. शहरात रुग्ण आढळून आल्यानंतर आरोग्य विभाग कामाला लागला असून, शिवाजी पार्क या भागात घरोघरी सर्वेक्षण करण्यात आले, तसेच फवारणी करण्यात आली.‘त्या’ रुग्णाला सुटीस्क्रब टायफसची लागण झाल्यानंतर नागपूर येथे उपचार घेत असलेल्या अकोल्यातील रुग्णाला मंगळवारी सुटी देण्यात आली. तो आणखी १५ दिवस नागपूरमध्येच राहणार असल्याचे समजले आहे.आता अफवांचे पीकस्क्रब टायफसचा रुग्ण आढळून आल्यानंतर आता शहरात अफवांचे पीक आले आहे. तापडिया नगर भागात दोन जणांना स्क्रब टायफस झाल्याची अफवा मंगळवारी पसरली. आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तत्काळ त्या भागात जाऊन सर्वेक्षण केले असता त्यांना साधा व्हायरल ताप असल्याचे समोर आले.‘सर्वोपचार’मध्ये सज्जताशासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात स्क्रब टायफसचा सामना करण्यासाठी सज्जता ठेवण्यात आली आहे. औषधशास्त्र विभागाचे डॉ. मुकुंद अष्टपुत्रे यांच्या नेतृत्वात चमू सज्ज असून, स्क्रब टायफसचे निदान कसे करावे, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले आहे.स्क्रब टायफसचा संसर्ग वाढत असल्याने आरोग्य विभागाच्यावतीने राज्यभरातील आरोग्य यंत्रणेला सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. कोणत्याही भागात रुग्ण आढळल्यास त्या ठिकाणी तीन तासांत पोहोचून उपाययोजना करण्याच्या सूचना मिळाल्या आहेत. त्यादृष्टीने आमची यंत्रणा सज्ज आहे.- डॉ. अभिनव भुते, सहायक संचालक, आरोग्यसेवा (हि.) अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाHealthआरोग्य