लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : शासनाच्या बाजार हस्तक्षेप योजनेंतर्गत जिल्ह्यातील तूर खरेदीच्या नियोजनानुसार टोकन दिलेल्या सर्व तुरीचे पंचनामे करणे, त्यासोबतच गावनिहाय यादीतील गावांच्या इंग्रजी नावातील पहिल्या अक्षराच्या वर्णमालेतील क्रमानुसार मोजणी करण्याचे ठरले आहे. त्यामुळे टोकन क्रमांक आधीचा असला, तरी गावाच्या नावानुसार मोजणी झाल्यास शेतकºयांना आणखी ताटकळत ठेवण्याचा प्रकार जिल्ह्यात घडणार आहे. शेतकºयांच्या नावावर धंदा करणाºया व्यापाºयांचा छडा लावण्यासाठी ही उपाययोजना असल्याची माहिती आहे.शासनाच्या अधारभूत किंमत योजनेंतर्गत ‘नाफेड’द्वारे हमीदराने तूर खरेदी १० जूनपासून बंद आहे. तेव्हापासून जिल्ह्यातील पाच ठिकाणी असलेल्या खरेदी केंद्रांवर ३ लाख ५० हजारांपेक्षाही अधिक क्विंटल तूर पडून आहे. त्यापेक्षाही अधिक तूर शेतकºयांच्या घरातच पडून आहे.ती सर्व तूर शेतकºयांचीच आहे, ही बाब शंकास्पद आहे. त्यामुळे बाजार समिती परिसर आणि शेतकºयांकडे पडून असलेल्या तुरीचे प्रत्यक्ष पंचनामे केले जाणार आहेत. त्यानुसार प्रत्येक गावात कोणत्या शेतकºयांकडे किती तूर आहे, याची गावनिहाय यादी तयार होईल.खरेदी केंद्रांतर्गत असलेल्या सर्व गावांची यादी तयार केली जाईल. त्या यादीमध्ये गावांच्या नावातील पहिल्या अक्षराचा इंग्रजी वर्णमालेतील क्रम लावून त्या गावातील शेतकºयांना एकाच दिवशी केंद्रावर बोलावले जाणार आहे. त्यातून खरेदी प्रक्रिया वेगात होणार असल्याचा प्रशासनाला विश्वास आहे. सोबतच शेतकºयांच्या नावावर व्यापाºयांनी केलेल्या तुरीची नोंदही उघड होणार आहे.सर्वेक्षणाला आजपासून सुरुवात३१ मेपर्यंत टोकन देण्यात आलेल्या तुरीची खरेदी करण्याचा निर्णय २१ जुलै रोजी शासनाने घेतला. जिल्ह्यातील १४ हजार ५२४ शेतकºयांची तूर खरेदी सुरू करण्यापूर्वी पंचनामे करून याद्या तयार होणार आहेत. त्यामुळे खरेदी प्रक्रिया उद्या बुधवारपासून सुरू होण्याची शक्यता आहे.गावांमध्ये धडकणार तपासणी पथकज्या शेतकºयांनी घरात तूर असल्याची नोंद केली आहे, त्यांच्याकडे शासकीय कर्मचाºयांचे पथक उद्या बुधवारी धडकणार आहे. त्यामध्ये कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक, ग्रामसेवक, तलाठी यांचा सहभाग राहणार आहे. केंद्रावर पडून असलेल्या तुरीचे पंचनामे सहकार विभागाचे अधिकारी करणार आहेत.तूर खरेदीमध्ये शासन निर्देशानुसार दक्षता घेण्यासाठी पंचनामे करून गावनिहाय याद्या तयार होणार आहेत. त्या याद्यानुसार सर्वच गावांतील खरेदीचा वेग वाढणार आहे. त्यातून पारदर्शकपणे शेतकºयांची तूर खरेदी होणार आहे.- जी.जी. मावळे, उपनिबंधक, सहकारी संस्था.
तूर व्यापा-यांचा शोध इंग्रजी वर्णमालेच्या आधारे!
By ram.deshpande | Published: July 26, 2017 2:27 AM
लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : शासनाच्या बाजार हस्तक्षेप योजनेंतर्गत जिल्ह्यातील तूर खरेदीच्या नियोजनानुसार टोकन दिलेल्या सर्व तुरीचे पंचनामे करणे, त्यासोबतच गावनिहाय यादीतील गावांच्या इंग्रजी नावातील पहिल्या अक्षराच्या वर्णमालेतील क्रमानुसार मोजणी करण्याचे ठरले आहे. त्यामुळे टोकन क्रमांक आधीचा असला, तरी गावाच्या नावानुसार मोजणी झाल्यास शेतकºयांना आणखी ताटकळत ठेवण्याचा प्रकार जिल्ह्यात घडणार आहे. ...
ठळक मुद्देटोकन क्रमांकाऐवजी गावांच्या वर्णाक्षरामुळे खरेदीला विलंबाची शक्यता