आलेगाव(अकोला) : पाण्याच्या शोधात गावात शिरलेल्या रोहिचा (निलगाय) मृत्यू झाल्याची घटना अकोल्यातील पातूर तालुक्याच्या शेकापूर गावात बुधवारी घडली . जखमी रोहिला वाचवण्याचा प्रयत्न वनविभागाने केला, मात्र गंभीर जखमी रोहिचा मृत्यू झाला.
पाण्याच्या शोधत आलेला रोही (निलगाय) पातूर तालुक्याच्या शेकापूर गावात बुधवारी सकाळी 7 वाजताच्या दरम्यान शिरला, गावातील कुत्रे मागे लागल्याने रोही गावभर सैरावैरा पळत सुटला. स्वतःला कुत्र्यांपासून वाचवण्यासाठी गावातील डिगंबर राठोड यांच्या किराणा दुकानात शिरला.दुकानात हजारो रूपयाचा माला चा नुकसान केले दुकानतील फ्रिज झेरोक्स मशीन फर्नीचर तोड़फोड़ केले तसेच दुकानात सामानची नसधुस केली दुकानातून बहेर जाण्यासाठी रोहिने प्रयत्न करत असताना रोही रक्ताने गंभीर जखमी झाल्यामुळे दुकानात पूर्ण रक्त पडलेले दिसून आले दुकानाचे नुकसान केले. त्या तो रोही गंभीर जखमी झाला. याची माहिती वनविभागाला मिळताच वनविभागाचे कर्मचारी लखन खोकड, सतीश सावळे, राजू हुसेन, गजानन मूर्तडकर, गजानन काळदाते, दीपक धाईत, जितू काठोळे आणि इतर कर्मचाऱ्यांनी रोहिला बाहेर काढण्याचा अथक पर्यंत केला, मात्र जखमी रोहिचा मृत्यू झाला. जखमी रोहिला बाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी वनविभागाच्या दवाखान्यात नेण्यात आले.