जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक शुक्रवारी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार, मनपा आयुक्त निमा अरोरा, पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ. कुसुमाकर घोरपडे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांची उपस्थिती होती. बैठकीत कोविड पॉझिटिव्हिटी रेट तसेच उपलब्ध ऑक्सिजन खाटांची स्थिती लक्षात घेता जिल्ह्याचा समावेश दुसऱ्या श्रेणीत करण्यात आला. त्यानुसार सोमवार २१ जूनपासून जिल्ह्यातील निर्बंध शिथिल होणार असून, सायंकाळी ७ वाजेपर्यंत बाजारपेठ सुरू राहणार आहे. तसेच वीकेंडला औषधांची प्रतिष्ठाने वगळून उर्वरित संपूर्ण बाजारपेठ बंद राहणार आहे.
अशी मिळाली शिथिलता
अत्यावश्यक दुकाने, अत्यावश्यक नसलेली दुकाने सायंकाळी ७ वाजेपर्यंत सुरू राहतील.
चित्रपटगृहे , नाट्यगृहे, मनोरंजन केंद्र - ५० टक्के आसन क्षमतेसह रात्री १० वाजेपर्यंत
रेस्टॉरंट / भोजनालय - ५० टक्के आसन क्षमतेसह. रात्री दहा वाजेपर्यंत
सार्वजनिक ठिकाणे, खुली मैदाने, जॉगिंग पार्क/सायकलिंग - नियमित
खासगी कार्यालये - नियमित वेळेनुसार
सर्व शासकीय तसेच खासगी कार्यालय उपस्थिती - १०० टक्के उपस्थितीसह
सर्व क्रीडा विषयक उपक्रम - नियमित
सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम/ स्नेह संमेलन, मनोरंजनात्मक कार्यक्रम - ५० टक्के आसन क्षमतेसह. सायंकाळी ७ वाजेपर्यंत
लग्न समारंभाचे आयोजन - मंगल कार्यालय/ सभागृहामध्ये ( आसन क्षमतेच्या ५० टक्के किंवा १०० व्यक्ती यापैकी जे कमी असेल.)
अंत्यविधी - ५० व्यक्ती मर्यादेत
स्थानिक स्वराज्य संस्था /सहकारी संस्था यांच्या सर्वसाधारण सभा आयोजन/ निवडणूक - सभागृहाच्या ५० टक्के क्षमतेसह.
बांधकाम - नियमित
कृषी विषयक सेवा व सेवा केन्द्र - नियमित वेळेनुसार
ई-कॉमर्स वस्तू व सेवा - नियमित वेळेनुसार
जीम/व्यायामशाळा/सलून/ब्युटी पार्लर/स्पा/वेलनेस सेंटर - ५० टक्के क्षमतेसह सायंकाळी सात वाजेपर्यंत
सार्वजनिक वाहतूक - नियमित (उभ्याने प्रवास करता येणार नाही)
सर्व प्रकारची कार्गो वाहतूक - नियमित
आंतरजिल्हा प्रवासी वाहतूक
खासगी कार, टॅक्सी, बस, रेल्वे ई. द्वारे आंतरजिल्हा प्रवासी वाहतुकीस मुभा असेल. तथापि श्रेणी -५ मधून ये-जा करणाऱ्या प्रवाशांकडे ई-पास असणे अनिवार्य राहील.
या सेवा नियमित सुरू राहतील
औद्योगिक केंद्र / एमआयडीसी
उत्पादन क्षेत्र ( अत्यावश्यक वस्तू व त्याकरिता लागणारा कच्चा माल, उत्पादक व पॅकेजिंग व संपूर्ण साखळीतील सेवा व निरंतर प्रक्रिया असलेले उद्योग, संरक्षण संबंधित उद्योग, डाटा सेंटर / क्लाऊड सर्व्हिस प्रोव्हायडर / माहिती व तंत्रज्ञान सेवा संबंधी / गुंतागुतीच्या पायाभूत सेवा व उद्योग )