शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
7
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
8
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
9
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
10
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
11
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
12
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
13
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
14
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
15
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
16
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
17
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
18
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
19
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया

‘अमृत’ अभियानचा दुसरा टप्पा अधांतरी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2020 10:58 AM

पहिल्या टप्प्यात शहरात ६७ कोटी रुपयांतून भूमिगत गटार योजनेचे काम थातुरमातुर होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: केंद्र शासनाच्या ‘अमृत’अभियान अंतर्गत पहिल्या टप्प्यात शहरात ६७ कोटी रुपयांतून भूमिगत गटार योजनेचे काम थातुरमातुर होत आहे. तसेच ११० कोटींपैकी ८७ कोटीतून सर्व निकष-नियम धाब्यावर बसवित पाणी पुरवठा वितरण प्रणालीचे काम सुरू आहे. दुसऱ्या टप्प्यातील कामासाठी तांत्रिक सल्लागार एमजेपीने ‘डीपीआर’साठी ३ कोटी १४ लक्ष रुपयांचा भरणा करण्याचे पत्र मनपाला दिले आहे. मनपात भाजपची सत्ता ध्यानात घेता आघाडी सरकारकडून दुसºया टप्प्यासाठी निधी मिळणे दुरापास्त आहे. तसे झाल्यास जादा दराने निविदा मंजूर करीत मलिदा लाटणाºया काही राजकारण्यांसह अधिकाऱ्यांच्या दुकानदारीवर पाणी फेरल्या जाणार आहे.राज्यातील महापालिका, नगरपालिका तसेच नगर पंचायत क्षेत्रातील विकास कामांसाठी सन २०१९-२० करिता देण्यात आलेल्या निधीचा शासनाने लेखाजोखा घेण्यास प्रारंभ केल्याचे दिसून येत आहे. सुवर्ण जयंती नगरोत्थान योजना, रस्ता अनुदान, हद्दवाढ क्षेत्रातील विकास कामे आदी विविध विकास कामांचे कार्यादेश (वर्कआॅर्डर) दिले नसतील तर शासनाने संबंधित विकास कामांचा निधी इतरत्र वळता करण्याचे धोरण स्वीकारल्याचे दिसत आहे.आघाडी सरकारच्या या निर्णयामुळे सत्ताधारी भाजपच्या पायाखालची वाळू सरकल्याचे बोलल्या जात आहे. ‘अमृत’अभियानच्या पहिल्या टप्प्यात भूमिगत गटार योजनेचे काम झटपट निकाली काढल्या जात आहे, तसेच पाणी पुरवठा योजनेचे कामही थातुरमातुर केल्या जात आहे. राज्यात भाजपच्या ताब्यात असलेल्या महापालिकांना निधी देण्यासंदर्भात राज्य सरकारचे धोरण पाहता ‘अमृत’चा दुसरा टप्पा अधांतरी सापडण्याची दाट चिन्हं आहेत.

...तर ‘भूमिगत’चा उद्देश सफल होणार नाही!अकोलेकरांच्या घरातील सांडपाण्याचा निचरा होऊन डासांच्या उत्पत्तीला आळा घालणे व प्रक्रिया केलेल्या पाण्याचा शेती किंवा उद्योग व्यवसायाकरिता वापर करणे हा भूमिगत गटार योजनेचा उद्देश आहे. मोर्णा नदीच्या पात्रातून शिलोडा येथील एसटीपी (सीवरेज ट्रिटमेंट प्लान)पर्यंत मलवाहिनी टाकण्याचा समावेश हा दुसºया टप्प्यातील कामाचा भाग असताना केवळ खिसे गरम करण्याच्या उद्देशातून सदर कामाची सुरुवात पहिल्या टप्प्यात करण्यात आली. सत्ताधारी भाजपच्या विसंगत धोरणामुळे ‘भूमिगत’चा उद्देश सफल होणार नसल्याचे तूर्तास दिसत आहे.

हद्दवाढ क्षेत्रातील कामांवर गडांतरहद्दवाढ क्षेत्रातील विकास कामांसाठी शासनाकडून ९६ कोटी २३ लक्ष निधी मंजूर असून, यामधून ५५२ विकास कामांपैकी ३०५ कामे पूर्ण झाली आहेत. याबदल्यात कंत्राटदारांना आजवर ४० कोटींपेक्षा अधिक रकमेचे देयक अदा केले आहे. उर्वरित ८६ कामे अर्धवट स्थितीत आहेत. आघाडीचे सरकारचे धोरण पाहता उर्वरित निधीची शाश्वती नसल्यामुळे की काय,सत्तापक्ष भाजपने चौदाव्या वित्त आयोगातून तब्बल १३ कोटींचा आर्थिक हिस्सा वळता करण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. एकूणच हद्दवाढ क्षेत्रातील विकास कामांवरही गंडांतर आल्याचे दिसत आहे.

टॅग्स :AkolaअकोलाAkola GMC / Sarvopchar Rugnalayअकोला जीएमसी / सर्वोपचार रुग्णालय