‘वोंब ऑफ मेळघाट’ हा माहितीपट निसर्गाशी वंशागत जुळून असलेला मेळघाटामधील कोरकू आदिवासी समुदाय मेळघाट व्याघ्र प्रकल्पातून विस्थापनानंतर किती सामाजिक आणि प्रशासनिक समस्यांशी झुंजतो हे या माहितीपटात मुख्यतः चित्रित केले आहे. हा माहितीपट महाराष्ट्र प्रकल्पबाधित व्यक्तींचे पुनर्वसन कायद्यातील तरतुदींच्या प्रशासनिक उल्लंघनावर प्रखरपणे प्रकाश टाकतो.
राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाच्या सहाव्या लघू चित्रपट महोत्सवात संपूर्ण भारतातून ९३ स्पर्धकांची नोंद झाली.
‘वोंब ऑफ मेळघाट’चे चित्रीकरण आणि संपादन ऋषिकेश खंबायत यांनी केले. मूर्तरूप साकारण्यासाठी डॉ. निशा केमसे-कांबळे यांनी नेपथ्य विभाग सांभाळला. प्रा.स्वप्नील सुनील कांबळे यांचे सहदिग्दर्शन केले. ‘वोंब ऑफ मेळघाट’चे चित्रीकरण करणारे चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक डॉ.नितीन गणोरकर मूळचे मधापुरी गावचे आहेत. या आधी त्यांचे ‘सावकार’, ‘माझं गांव’, ‘आर्चेरी’ हे लघूचित्रपट व माहिती चित्रपट प्रकाशित झाले आहेत.