लोकमत न्यूज नेटवर्कपातूर : तालुक्यातील मळसूर येथील कविता जितेश पटेल (३0) हिचा ३१ ऑक्टोबर रोजी खून करून विवरा फाट्याजवळील रस्त्यावर मृतदेह टाकण्यात आला होता. या महिलेचा खून अनैतिक संबंधातून झाल्याचा संशय पातूर पोलिसांनी व्यक्त केला असून, दुसर्या संशयीतास १ नोव्हेंबर रोजी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणात मोबाइल कॉल डिटेलवरून पोलीस तपास करीत आहेत. मळसूर येथील मृत कविता जितेश पटेल हिचा मृतदेह ३१ ऑक्टोबर रोजी विवरा फाट्याजवळ आढळला होता. घटनेची माहिती मिळताच पातूर पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेऊन पंचनामा केला होता. याप्रकरणी गिरजा शंकर पारसकर यांनी पातूर पोलिसात फिर्याद दिली आहे. सदर महिलेचा खून अनैतिक संबंधातून झाल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यामुळे पोलिसांनी ३१ ऑक्टोबरच्या रात्रीच वाडेगाव येथील संशयित राजेंद्र ऊर्फ रवी सरप (पाटील) यास चौकशीसाठी ताब्यात घेलले आहे. तसेच त्याच्याकडून दोन मोबाइल जप्त करण्यात आले आहेत व सध्या मोबाइल कॉल डिटेलचा तपास सुरू आहे. त्या मृत महिलेसोबत त्याने अनैतिक संबंध असल्याची कबुली दिली आहे. त्याच्या चौकशीतून पोलिसांनी विलास अवचार या दुसर्या संशयीत आरोपीस ताब्यात घेतले आहे. पुढील तपास पातूर पोलीस निरीक्षक डी. सी. खंडेराव यांच्या मार्गदर्शनात पी. एल. झोडगे करीत आहेत.
महिलेच्या हत्येप्रकरणी दुसरा संशयित ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 02, 2017 2:14 AM
पातूर : तालुक्यातील मळसूर येथील कविता जितेश पटेल (३0) हिचा ३१ ऑक्टोबर रोजी खून करून विवरा फाट्याजवळील रस्त्यावर मृतदेह टाकण्यात आला होता. या महिलेचा खून अनैतिक संबंधातून झाल्याचा संशय पातूर पोलिसांनी व्यक्त केला असून, दुसर्या संशयीतास १ नोव्हेंबर रोजी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणात मोबाइल कॉल डिटेलवरून पोलीस तपास करीत आहेत.
ठळक मुद्देकॉल डिटेलवरून हत्येचा तपास सुरू