शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
4
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
5
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
6
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
7
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
8
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
9
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
10
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
11
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
12
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
13
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
14
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
15
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
16
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
17
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
18
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
20
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...

माध्यमिक शाळेची घंटा वाजली, प्राथमिकही लवकरच सुरू होणार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2021 4:22 AM

जिल्ह्यात ३५६ शाळा सुरू जिल्ह्यात माध्यमिकच्या इयत्ता आठवी ते बारावीपर्यंतच्या ३७१ शाळांपैकी ३५६ शाळा सुरू झाल्या आहेत; परंतु विद्यार्थ्यांची ...

जिल्ह्यात ३५६ शाळा सुरू

जिल्ह्यात माध्यमिकच्या इयत्ता आठवी ते बारावीपर्यंतच्या ३७१ शाळांपैकी ३५६ शाळा सुरू झाल्या आहेत; परंतु विद्यार्थ्यांची उपस्थिती कमी आहे. प्राथमिकच्या शाळा सुरू करण्यात आल्या; परंतु विद्यार्थ्यांना शाळेत येण्याची परवानगी शासनाने अद्याप दिलेली नाही. तोंडी सूचना असल्यामुळे संभ्रम आहे.

सॅनिटायझेशन करा, पैसे देणार कोण?

शासनाने माध्यमिक शाळा सुरू केल्या. आता प्राथमिक शाळा सुरू करण्याच्या हालचालीही सुरू केल्या आहेत; परंतु शाळा, वर्गांचे सॅनिटायझेशन करावे लागणार आहे. त्यासाठी पैसा कोण देणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. शिक्षण विभागाने मेंटनन्स अनुदान दिले असून, त्यातून हा खर्च भागविण्यास सांगितले आहे.

तोंडी आदेशामुळे मुख्याध्यापकांसमोर पेच

प्राथमिक शाळा सुरू करण्यास शासनाने अद्याप परवानगी दिली नसली तरी, शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी तोंडी सूचना दिल्या आहेत. पालकांची संमती, ग्रामपंचायतीचा ठराव, न.प., मनपा यांची संमती असल्यास आणि कोरोनामुक्त परिसर, गाव असल्यास शाळा सुरू कराव्यात, अशा सूचना आहेत; परंतु लेखी नसल्यामुळे मुख्याध्यापकांसमोर पेच निर्माण झाला आहे. शाळा सुरू केल्यानंतर मुलांच्या आरोग्याची समस्या निर्माण झाल्यास कोण जबाबदारी घेईल, असाही प्रश्न आहे.

माध्यमिकच्या शाळा सुरू आहेत. प्राथमिक शाळांमधील शिक्षक, मुख्याध्यापक शाळांमध्ये जात आहेत; परंतु प्राथमिक शाळा सुरू करण्याबाबत शासनाचे आदेश नाहीत. परिस्थिती पाहून शाळा सुरू करण्याच्या तोंडी सूचना आहेत. त्यामुळे संभ्रम आहे.

-दिलीप तायडे, उपशिक्षणाधिकारी प्राथमिक

कोणत्या वर्गात किती विद्यार्थी?

पहिली- २९५०८

दुसरी- २९३४९

तिसरी- २९४६४

चौथी- २९८१२

पाचवी- २९७२९

सहावी- २९४३८

सातवी- २९३४०

आठवी- २८५९५

नववी- २८७५०

दहावी- ३०१७८

अकरावी- २५८३३

बारावी- २२८८९