शहरं
Join us  
Trending Stories
1
"...यामुळेच हा ऐतिहासिक विजय झाला"; हरयाणाच्या निकालावर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया
2
परदेशात जाऊन आपल्या देशाचा अपमान करणाऱ्यांना जनतेने धडा शिकवला- अमित शाह
3
J&K मध्ये फुटीरतावादाचा सुपडा साफ, एआयपी आणि जमात-ए-इस्लामीला मतदारांनी नाकारले
4
जुन्नरमध्ये आयात उमेदवाराच्या हाती तुतारी दिल्यास बंड अटळ?; मविआतील नाराज निष्ठावंतांच्या गोटात हालचालींना वेग
5
'तेरे करके' पेक्षा No Look Shot ची चर्चा; नताशाच्या पोस्टवर 'हार्दिक' कमेंटचं ट्विस्ट
6
"महाराष्ट्रातील जनताही अशा फेक..."; हरयाणातील निकालानंतर CM शिंदेंचा MVA वर 'वार'
7
"आपण तर खरोखरच मोठी 'पनौती' निघालात, हुड्डांनाही..."; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा राहुल गांधींवर निशाणा
8
"हा विजय केवळ मोदीजींमुळेच शक्य झाला"; हरयाणाच्या निकालानंतर मुख्यमंत्री सैनी यांचे विधान
9
बुलेट ट्रेन जितकी खास, तितकीच स्टेशनही... वीज बचत अन् प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य!
10
Haryana, Jammu & Kashmir Assembly Election Results 2024 Live: काँग्रेसचे 'खटाखट-खटाखट' मॉडेल फेल: अनुराग ठाकूर
11
'आजच बारामतीचा उमेदवार जाहीर करा'; अजित पवार म्हणाले, "तुमच्या मनातील..."
12
"कुठे आम्ही ६० जागा जिंकण्याच्या बाता मारत होतो आणि…’’, निकालांबाबत कुमारी शैलजा म्हणाल्या
13
जम्मू-काश्मीरच्या 'या' सात जागांवर काँग्रेस आणि एनसीत मैत्रीपूर्ण लढत; जाणून घ्या निकाल...
14
नायब सिंह सैनींनी मारली बाजी; विजयादशमीला घेऊ शकतात मुख्यमंत्रीपदाची शपथ?
15
"मल्लिकार्जुन खर्गेजी पत्ता सांगा, 'ती' जिलेबी...", भाजप खासदार तथा केंद्रीय मंत्र्याचा राहुल गांधींना बोचरा टोला
16
नवी मुंबईत महायुतीला झटका, शिंदेसेनेत बंडखोरी होणार, विजय नाहटा तुतारी हातात घेणार
17
काँग्रेसचा हरयाणात पराभव; कुमारी शैलजा म्हणाल्या,'वेळेवर मौन बाळगणे..."
18
हरियाणा निकालाचे पडसाद महाराष्ट्रात; उद्धव ठाकरे आक्रमक, "CM पदाचा चेहरा.."
19
Explainer: हरयाणाच्या निकालाने वाढवलं महाविकास आघाडीचं 'टेन्शन'; चार मुद्दे इथेही पडू शकतात भारी!
20
Haryana Jammu & Kashmir Assembly Election Results 2024 : हरियाणा-जम्मू काश्मीरमध्ये भाजपनं किती मुस्लिमांना दिलं होतं तिकीट? किती जिंकले?

शिक्षिकेचे लैंगिक शोषण करणारा संस्था सचिव कारागृहात

By admin | Published: May 24, 2014 12:20 AM

पातूर येथील एका शिक्षिकेवरील बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपीची कारागृहात रवानगी.

अकोला : पातूर येथील एका शिक्षिकेवरील बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपी संस्थेच्या सचिवाला स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी शुक्रवारी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याची कारागृहात रवानगी करण्याचे आदेश दिले. आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिसांनी १७ मे रोजी अटक केली होती. २३ मे रोजी आरोपीच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्याने त्याला शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात आले. नोकरीवरून काढून टाकण्याची धमकी देत अत्याचार केल्याची तक्रार एका ४० वर्षीय सहायक शिक्षिकेने पातूर पोलिस ठाण्यात दिली होती. या फिर्यादीवरून पोलिसांनी ३१ ऑक्टोबर २0१३ रोजी संस्था सचिव सैयद कमरोद्दीन सैयद इस्माईलसह शेख आरिफ शेख गफ्फार, अब्दुल जब्बार अब्दुल गफ्फार, मोहम्मद साजेद मोहम्मद सादीक, शेख आसिफ शेख वाहेद यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी शेख आरिफ शेख गफ्फार, अब्दुल जब्बार अब्दुल गफ्फार, मोहम्मद साजेद मोहम्मद सादीक, शेख आसिफ शेख वाहेद या आरोपींना अटक केली. संस्था सचिव सैयद कमरोद्दीन हा फरार झाला होता. आरोपी सैयद कमरोद्दीन याने ३० एप्रिल २०१४ रोजी सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता; परंतु न्यायालयाने अर्ज फेटाळला. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानेही त्याचा अर्ज फेटाळला.