यात रस्त्यावरून जाणाच्या मिरवणुकीतील किंवा जमावातील लोक अशारीतीने चालतील त्यांची वर्तणूक कशी असावी याविषयी निर्देश देणे, मिरवणूक व जमावाच्याप्रसंगी उपाययोजनेच्या सर्व जागेचे आसपास, उपाययोजनेच्या वेळी व कोणत्याही रस्त्याने किंवा सार्वजनिक जागी किंवा लोकांच्या एकत्र जमण्याच्या जागी गर्दी होणार असेल किंवा अडथळा निर्माण होण्याचा संभव असेल अशा सर्व प्रसंगी अडथळा होऊ न न देणे, अशा कोणत्याही मिरवणुका ज्या मार्गाने जाव्यात किंवा त्या मार्गाने जाऊ नयेत ते विहीत करणे, सर्व रस्त्यावर व नद्यांचे घाटावर आणि सार्वजनिक स्नानाचे, कपडे धुण्याचे, उतरण्याच्या ठिकाणी जागेमध्ये देवालय किंवा इतर सार्वजनिक किंवा लोकांच्या जाण्या-येण्याच्या जागेमध्ये बंदोबस्त व सुव्यवस्था राखणे, कोणत्याही रस्त्यावर किंवा सार्वजनिक जागेत किंवा जागेजवळ वाद्य वाजविण्यावे किंवा गाण्याचे किंवा ढोल, ताशा, शिट्ट्या व इतर कर्कश वाद्य वाजविणे, आदींबाबत नियम तयार करणे व त्यावर नियंत्रण ठेवणे, कोणत्याही सार्वजनिक जागेत किंवा जागेजवळ किंवा सार्वजनिक उपहाराच्या (अतिथिगृहाच्या) जागेत ध्वनिक्षेपकाचा(लाऊड स्पीकर) उपयोग करण्याचे नियम करणे व त्यावर नियंत्रण करणे, सक्षम अधिकाऱ्यांनी या अधिनियमांचे कलम ३३,३६,३७ ते ४०,४२,४३ व ४५ अन्वये केलेल्या कोणत्याही आदेशास अधीन असलेले व त्यास पुष्टी देणारे योग्य आदेश देणे, आदी अधिकारांचा समावेश आहे. या आदेशाचे कोणीही, कोणत्याही प्रकारचे उल्लंघन केल्यास पोलीस अधिनियम कलम १३४ प्रमाणे शिक्षेस पात्र राहील, असे पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी आदेशात नमूद केले आहे.
जिल्ह्यात कलम ३६ लागू, पोलीस अधिकाऱ्यांना जादा अधिकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 07, 2021 4:24 AM