शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : शरद पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ 10 जागांवरच मानावं लागलं समाधान; कुठे कोण जिंकलं? बघा संपूर्ण लिस्ट
2
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: PM नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात १० प्रचारसभा; भाजपासह महायुतीचे किती उमेदवार विजयी झाले?
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठी उलथापालथ; शेवटच्या फेरीत काँग्रेसने मारली बाजी
4
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: लाडक्या बहिणींची नारीशक्ती, भीमशक्तीमुळे महायुतीचा ऐतिहासिक महाविजय: रामदास आठवले
5
महाराष्ट्रात भाजपने 148 पैकी 132 जागा जिंकल्याच कशा? काँग्रेसने उपस्थित केला प्रश्न...
6
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “विधानसभा पराभवावर चिंतन करु, जनतेच्या प्रश्नासाठी काँग्रेस काम करत राहील”: नाना पटोले
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : महाराष्ट्रात ओवेसींचं '15 मिनिट'चं राजकारण 'फुस्स'; AIMIM चे 16 पैकी 15 उमेदवार पराभूत
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण ते नवाब मलिक...; या 17 मोठ्या नेत्यांना चाखावी लागली पराभवाची धूळ...!
9
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
10
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
11
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
12
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
13
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
14
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
15
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
16
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
17
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
18
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
19
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
20
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...

 राज्यात २२ जिल्ह्यात घेणार यावर्षी ग्राम बिजोत्पादन !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 03, 2018 2:18 PM

अकोला : यावर्षीच्या खरीप हंगामात राज्यातील २२ जिल्ह्यात ग्राम बीजोत्पादन कार्यक्रम राबविण्यात येणार असून, केंद्र व राज्य शासनाच्या या महत्त्वकांक्षी योजनेमध्ये शेतकऱ्यांना अनुदानावर बियाणे पुरवठा केला जाणार आहे.

ठळक मुद्दे सोयाबीन बियाणाची ३० किलोची एक गोणी शेतकºयांना १,३५० रुपयाला उपलब्ध करण्यात येईल. विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली व चंद्रपूर या पाच जिल्ह्यात धान पिकाचे बीजोत्पादन घेतले जाणार आहे.यासाठी लगणारे परमीट नजिकच्या कृषी विभाग तसेच महाबीज कार्यालयात उपलब्ध आहेत.

अकोला : यावर्षीच्या खरीप हंगामात राज्यातील २२ जिल्ह्यात ग्राम बीजोत्पादन कार्यक्रम राबविण्यात येणार असून, केंद्र व राज्य शासनाच्या या महत्त्वकांक्षी योजनेमध्ये शेतकऱ्यांना अनुदानावर बियाणे पुरवठा केला जाणार आहे. त्यासाठीची मंजुरी शासनाने शनिवारी दिली. ही योजना महाराष्टÑ बियाणे महामंडळ (महाबीज) राबविणार आहे.शेतकºयांनीच दर्जेदार बियाणे निर्माण करण्यासाठी शासनाने हे पाऊल उचलले आहे. सुरुवातीला सोयाबीन व धान या दोन पिकांचे बीजोत्पादन घेतले जाणार आहे. याकरिता सोयाबीन जे एस-३५ वाणाची निवड करण्यात आली असून, पुणे विभागातील पुणे, कोल्हापूर, सातारा व सांगली तसेच नागपूर विभागातील गडचिरोली,भंडारा, गोंदिया व संपूर्ण कोकण विभाग वगळून इतर २२ जिल्ह्यात हे वाण बीजोत्पादनासाठी वापरले जाणार आहे. सोयाबीन बियाणाची ३० किलोची एक गोणी शेतकºयांना १,३५० रुपयाला उपलब्ध करण्यात येईल. विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली व चंद्रपूर या पाच जिल्ह्यात धान पिकाचे बीजोत्पादन घेतले जाणार आहे. एमटीयू-१०१०, एमटीयू-१००१, आयआर-६४ व सुवर्णा या वाणांची २५ किलोची गोणी ४६२.५० रुपयांना उपलब्ध करण्यात येईल. जेजीएल-१७९८ वाणाची २५ किलोची गोणी ६८७.५० रुपये तर कर्जत-३ धान बियाणाची एक गोणी ४०० रुपयांना अनुदानावर दिली जाणार आहे.

  शेतकरी गट, उत्पादक कंपन्यांकडून घेणार बियाणेराज्यातील अधिकृत शेतकरी गट व शेतकरी उत्पादक कंपन्याकडे उत्पादित व प्रमाणित सोयाबीन उपलब्ध असल्यास महाबीज त्यांच्याकडून हे बियाणे खरेदी करणार आहे. त्यासाठी शेतकरी गट, उत्पादक कंपन्यांनी संपर्क साधण्याचे आवाहन महाबीजने केले आहे.

परमीट उपलब्धग्राम बीजोत्पादन कार्यक्रमासाठी एक एकर क्षेत्र मर्यादा असून, यासाठी लगणारे परमीट नजिकच्या कृषी विभाग तसेच महाबीज कार्यालयात उपलब्ध आहेत.

ग्राम बीजोत्पादन शासनाचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम असून,याकरिता भरीव अनुदान उपलब्ध करण्यात आले. शेतकºयांनी लोकवाट्याची रक्कम भरू न हे बियाणे घेऊन जावे, त्यासाठीचे परमीट उपलब्ध आहे.रामचंद्र नाके, महाव्यवस्थापक (विपणन),महाबीज,अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाMahabeejमहाबीज