शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही'; जयंत पाटलांनी अजित पवारांना डिवचले
2
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
3
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
4
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
6
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
7
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
8
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
9
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
10
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
11
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
12
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
13
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर
14
महाराष्ट्रात मविआ सरकार स्थापन करु, एकही प्रकल्प बाहेर जाऊ देणार नाही; राहुल गांधींचा शब्द
15
BSNL नं लॉन्च केली भारतातील पहिली Satellite-to-Device सर्व्हिस, आता नेटवर्कशिवायही करू शकाल कॉलिंग!
16
विरोधक सत्तेत आले तर पहिली लाडकी बहीण योजना बंद पाडतील; नरेंद्र मोदींची टीका
17
पंकजांनंतर अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; म्हणाले, "मी सेक्युलर हिंदू पण..."
18
"विद्यार्थ्यांची मागणी न्यायपूर्ण, सामान्यीकरण अस्वीकार्य ..."; राहुल गांधींनी प्रयागराजमधील आंदोलनावर दिली प्रतिक्रिया
19
"काही ईव्हीएम मशिनमध्ये गडबड! असं परदेशी माणूस म्हणतोय..."; सुप्रिया सुळे यांचा मोठा दावा
20
'या' देशातील ६ आंदोलनकर्त्यांना मृत्यूदंडांची शिक्षा; सरकारविरोधी निदर्शनांमध्ये होता सहभाग

आयकर विभाग,पोलीस शोधताहेत चार कोटीवरील शंभर रुपयाचे रहस्य!

By admin | Published: November 14, 2016 2:48 AM

मलकापूर व्यापा-याच्या चार कोटी रुपये जप्ती प्रकरणी रविवारीही केली कारवाई.

गणेश मापारी खामगाव, दि. १३- महाराष्ट्र -मध्य प्रदेशच्या सीमेवर शुक्रवारी एका लोहा व्यावसायिकाकडून जप्त करण्यात आलेल्या चार कोटी रुपयांमध्ये प्रत्येक एक कोटी रुपयांसोबत शंभर रुपयाची नोट ठेवण्यात आली होती. त्यामुळे कोटी रुपयासोबतच्या ह्यशंभर रुपयाह्णमध्ये जप्त करण्यात आलेल्या चार कोटीचे रहस्य दडलेले असून, मध्य प्रदेश पोलीस आणि आयकर विभागाने त्यादृष्टीने तपास सुरू केला आहे.बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर येथील शब्बीर हुसैन हे लोहा व्यावसायिक शुक्रवारी सायंकाळी कार क्रमांक एम.एच.२८ एएन २१५३ या वाहनाने मलकापूरवरुन मध्य प्रदेशातील बर्‍हाणपूर येथे जात होते. दरम्यान महाराष्ट्र व मध्य प्रदेशच्या सीमेवर असलेल्या अंतुर्ली गावानजिकच्या आंतरराज्यीय तपासणी नाक्यावर शहापुरा पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक कमल दवाणे तसेच लाभोराम पगेरा, मनीष यादव, टिकेश्‍वर निर्मल यांनी शब्बीर हुसैन यांचे वाहन थांबवून त्यांच्या वाहनाची झाडाझडती घेण्याचा प्रयत्न केला असता, शब्बीर हुसैन यांच्या कारमध्ये असलेल्या तीन सुटकेसमध्ये तब्बल ४ कोटी रुपये आढळून आले होते. विशेष म्हणजे प्रत्येक एक कोटी रुपयांसोबत शंभर रुपयांची नोट ठेवण्यात आली होती. दरम्यान, मध्य प्रदेशातील नेपानगर या विधानसभा मतदारसंघाची १९ नोव्हेंबर रोजी पोटनिवडणूक होत आहे. त्याचप्रमाणे पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे सर्वत्र ५00 व १ हजार रुपयांच्या नोटा बदलण्यासाठी धावपळ सुरू झाली आहे. मात्र बँकांमध्ये नोटा बदलण्यासाठी र्मयादा घालण्यात आली आहे. त्यामुळे ५00 व १ हजार रुपयांच्या नोटाचे बदल्यात १00 रुपयांच्या नोटा देणारे रॅकेट असल्याची शक्यतासुद्धा नाकारता येत नाही. कोटी रुपयांसोबतची शंभर रुपयांची नोट निवडणुकीच्या अनुषंगाने होती किंवा अवैधरीत्या नोटा बदलविण्यासाठी ह्यकोडह्ण म्हणून ठेवण्यात आली होती का? या दोन्ही बाबी मध्य प्रदेश पोलीस आणि मध्य प्रदेश आयकर विभाग तपासून पाहत आहेत. आणखी दोन वाहनचालकांकडून सहा लाखांची रोकड जप्तअंतुर्ली तपासणी नाक्यावर मध्य प्रदेश पोलिसांकडून वाहनांची तपासणी सुरूच आहे. रविवारी या तपासणी नाक्यावरून इंदूरकडे मारुती ओमनी वाहन क्रमांक एम.पी.0३ बीसी २७४८ ची तपासणी करण्यात आली असता, त्यामध्ये २ लाख ६९ हजार रुपये आढळून आले. सदर रक्कम वाहनातील रवींद्र सोनाजी पाटील व सोनाजी तुकाराम पाटील रा.इंदूर मध्य प्रदेश यांच्याकडून जप्त करण्यात आली. तसेच विना क्रमांकाच्या दुचाकीने जात असलेले प्रदीप गोकुलप्रसाद शिवहरे यांच्याकडे ३ लाख ६0 हजार रुपये आढळून आले. ही रक्कमसुद्धा पोलिसांनी जप्त केली असून, चौकशी करण्यात येत आहे. एकूणच चार कोटींची रक्कम आढळल्यानंतर पोलिसांकडून कसून तपासणी केली जात आहे.आयकर विभागाकडून झाडाझडतीपोलीस कारवाईत जप्त करण्यात आलेले चार कोटी रुपयांची माहिती आयकर विभागाला देण्यात आली आहे. त्यामुळे आयकर विभागाने शब्बीर हुसैन यांच्याकडे आलेल्या रकमेसोबतच त्यांच्या व्यवसायाबाबत झाडाझडती सुरू केली आहे.