नाभिक महामंडळाने दिलेल्या निवेदनानुसार, कोरोनाला रोखण्यासाठी राज्य सरकारने मिनी लॉकडाऊनची घोषणा केली आहे. नियमावलींमध्ये सर्व व्यवसाय सोडून फक्त सलून व्यवसाय बंद राहील, अशी घोषणा केली आहे. हा महाराष्ट्रातील नाभिक समाजावर अन्याय आहे. पूर्वीच्या लॉकडाऊनमध्ये नाभिक समाजातील सलून व्यावसायिक संकटात सापडलेले आहेत. अनलॉक प्रक्रियेत सलून व्यावसायिकांनी घरातील दागदागिने विकून दुकान भाडे, घर भाडे व वीज बिलाचा भरणा केला आहे. असे असताना परत लॉकडाऊन घोषित करून सलून व्यवसायावर बंदी घातली आहे. त्यामुळे सलून व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. नाभिक समाजाच्या मागण्यांसंदर्भात लक्ष केंद्रित करून न्याय द्यावा, अशी मागणी शासनाकडे करण्यात आली आहे. मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. या वेळी तालुका महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे मूर्तिजापूर तालुका अध्यक्ष भावेश दिनेशभाई झाला, तालुका उपाध्यक्ष रवी पळसकर, ता. सचिव अनुप दहीहांडेकर, मूर्तिजापूर तालुका नाभिक दुकानदार संघटना अध्यक्ष संतोष रुद्रकार, शहराध्यक्ष संतोष श्रीवास, शहर उपाध्यक्ष संतोष कुकळकर, शहर सचिव राजेंद्र कान्हेरकर, शहर प्रमुख रंजीत झारोडीया, नीलेश दहीहांडेकर, बंटी कुकळकर, गणेश कळसकर, संजय झारोडिया, साहेबराव धानोरकर, आशिष दहीहांडेकर, अवधूतराव कुकळकर, इसाक सलमाने, मो. आरिफ, शैलेंद्र श्रीवास, रोहित श्रीवास, विनोद डहाके, उमेश खंडारे, प्रफुल बुढळकर, योगेश धामोरे आदी उपस्थित होते.
सलून व्यवसाय सुरू करण्याची परवानगी देण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 4:18 AM