शहरं
Join us  
Trending Stories
1
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
2
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
3
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेटपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
4
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
5
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
6
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
7
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
8
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
9
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल
10
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
11
फक्त या ४ गोष्टी वर्ज्य करून गायकानं घटवलं १३० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण
12
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
13
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
14
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योगगुरूंनीच सांगितलं...
15
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
16
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
17
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
18
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
19
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
20
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!

पंचायत समित्यांमधील शिल्लक जुने साहित्य वाटपासाठी लाभार्थींची निवड करा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 04, 2021 4:23 AM

अकोला: जिल्हा परिषद समाजकल्याण विभागामार्फत सेस फंडातून पाच वर्षांपूर्वी राबविण्यात आलेल्या विविध योजनांतर्गत जिल्ह्यातील पंचायत समित्यांमध्ये पडून असलेले ...

अकोला: जिल्हा परिषद समाजकल्याण विभागामार्फत सेस फंडातून पाच वर्षांपूर्वी राबविण्यात आलेल्या विविध योजनांतर्गत जिल्ह्यातील पंचायत समित्यांमध्ये पडून असलेले शिल्लक साहित्य वाटप करण्यासाठी योजनानिहाय लाभार्थींची निवड तातडीने करण्याचा ठराव जिल्हा परिषद समाजकल्याण समितीच्या सभेत शुक्रवारी मंजूर करण्यात आला.

जिल्हा परिषदेच्या २० टक्के सेस फंडातून समाजकल्याण विभागामार्फत पाच वर्षांपूर्वी राबविण्यात आलेल्या विविध साहित्य वाटपाच्या योजनांमधील शिल्लक असलेले जुने साहित्य जिल्ह्यातील पंचायत समित्यांच्या स्तरावर गेल्या पाच वर्षांपासून पडून आहे. पंचायत समित्यांच्या स्तरावर पडून असलेले जुने साहित्य वाटप करण्यासाठी योजनानिहाय लाभार्थींची निवड करण्याच्या विषयाला सभेत मंजुरी देण्यात आली. तसेच अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तीचा विकास करणे योजनेंतर्गत जिल्ह्यातील कामांच्या नियोजनावर सभेत चर्चा करण्यात आली. जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती आकाश शिरसाट यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या या सभेला समितीचे सदस्य आणि समाजकल्याण अधिकारी पुंड उपस्थित होते.

रिक्त पदांवर कर्मचारी द्या;

समितीचे ‘सीईओं’ना साकडे !

जिल्हा परिषद समाजकल्याण विभागात कर्मचाऱ्यांची सहा पदे रिक्त असल्याने, योजनांच्या अंमलबजावणीसह प्रशासकीय कामकाजात अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे समाजकल्याण विभागातील रिक्त पदांवर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याची मागणी समाजकल्याण सभापती आकाश शिरसाट यांच्यासह समाजकल्याण समितीचे सदस्य डाॅ. प्रशांत अढाऊ, आम्रपाली खंडारे, नीता गवई, संदीप सरदार आदी सदस्यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सौरभ कटियार यांच्याकडे केली. त्या अनुषंगाने जिल्हा परिषद समाजकल्याण विभागातील रिक्त पदांवर दोन कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार असल्याची ग्वाही मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी समाजकल्याण समितीच्या सदस्यांना यावेळी दिली.

..................फोटो....................