पंचायत समितीचे सभागृहामध्ये पंचायत समितीच्या सभापती लक्ष्मी डाखोरे यांच्या अध्यक्षतेखाली जंगली जनावरापासून पिकांचे रक्षण करण्याकरता १०० टक्के अनुदानावर असलेली शेत संरक्षण यंत्र वाटपासाठी असलेल्या योजनेची सोडत उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ५ फेब्रुवारी रोजी काढण्यात आली. यावेळी गटविकास अधिकारी अनंत लव्हाळे, उपसभापती नजमुन्नीसा, कृषी अधिकारी जयंत सोनोने, विस्तार अधिकारी ठाकरे, ग्रामसेविका रेखा खोकले, गणेश घुगे उपस्थित होते. यामध्ये उपस्थित असलेल्या सर्वांसमोर एकूण पन्नास लाभार्थ्यांची यादी वाचन कृषी विस्तार अधिकारी ए.टी. ठाकरे यांनी केले. त्यानंतर लकी ड्रॉ पद्धतीने छायाताई जैन चान्नी, कमलाबाई जैन चान्नी, अशोक इंगळे, जय श्रीराम गुडदे आगीखेड, धम्मपाल इंगळे आस्टुल, मोहन काळपांडे आलेगाव, राजेश इंगळे आस्टुल, द्वारकाबाई इंगळे आस्टुल, दीपक सदार चांगेफळ, सहदेव उजाडे हिंगणा, रामराव इंगळे चान्नी, सीताबाई डुकरे उमरवाडी, सुपाजी बहाकर पारडी अशा १३ लाभार्थ्यांची निवड करण्यात आली.
शेत संरक्षण यंत्रासाठी १३ शेतकऱ्यांची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 07, 2021 4:17 AM