महापालिकेत स्थायी समितीमध्ये सत्ताधारी भाजपचे दहा सदस्य आहेत. तसेच सेनेचे दाेन, काॅंग्रेसचे दाेन व दाेन सदस्य लाेकशाही आघाडीचे असे एकूण १६ सदस्य आहेत. यापैकी आठ सदस्य निवृत्त झाले असून यामध्ये भाजपचे पाच, सेना,काॅंग्रेस व लाेकशाही आघाडीच्या प्रत्येकी एका सदस्याचा समावेश आहे. गुरूवारी ऑनलाइनद्वारे सदस्य निवडीची सभा पार पडली असता भाजपतर्फे आरती घाेगलिया, माधुरी मेश्राम, आम्रपाली उपरवट, मंगला साेनाेने व अनुराधा नावकार यांची निवड करण्यात आली. तसेच सेनेच्यावतीने प्रमीला गीते, लाेकशाही आघाडीतर्फे शितल गायकवाड व काॅंग्रेसकडून माेहम्मद इरफान व पराग कांबळे यांना संधी देण्यात आली.
डाॅ.जिशान हुसेन यांना संधी का नाही!
स्थायी समितीमध्ये निवड केलेल्या माेहम्मद इरफान व पराग कांबळे यांना यापूर्वीही संधी देण्यात आली हाेती. या दाेघांची दुसऱ्यांदा निवड करण्यात आल्याने काॅंग्रेसच्या भूमिकेवर प्रश्नचिन्हं उपस्थित केले जात आहेत. सभागृहात पक्षाची भक्कमपणे बाजू मांडणाऱ्या डाॅ.जिशान हुसेन यांना संधी का नाकारली,यावर पक्षातील इतर नगरसेवकांमध्ये जाेरदार चर्चा हाेत आहे.