अकोला : भारतीय जनता पार्टीमध्ये दर तीन वर्षांनी जिल्हा व शहर कार्यकारिणीची फेरनिवड केली जाते. जिल्हाध्यक्ष तेजराव थोरात पाटील आणि महानगराध्यक्ष किशोर मांगटे पाटील यांचा कार्यकाळ संपुष्टात आला असून, येत्या २८ जानेवारीपर्यंत दोन्ही प्रमुख पदांसाठी निवड प्रक्रिया पार पडणार आहे. जिल्ह्याची जबाबदारी स्वीकारण्यासाठी दिग्गजांमध्ये स्पर्धा रंगण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे शहरावर मजबूत पकड निर्माण केलेल्या किशोर मांगटे पाटील यांना दुसºयांदा संधी दिली जाण्याचे संकेत आहेत. असे असले तरी पक्षाच्या अंतिम निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.शिस्तबद्धा यंत्रणा, मजबूत संघटन अशी ओळख असलेल्या भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष व महानगराध्यक्ष पदासाठी निवड प्रक्रिया पार पडणार आहे. पक्षातून सक्रिय सदस्य नोंदणी करण्याची प्रक्रिया वर्षभर सुरू राहत असली तरी निवड प्रक्रियेत जिल्हा कार्यकारिणीतील १० मंडळ अध्यक्ष व शहर कार्यकारिणीतील ६ मंडळ अध्यक्ष यांची महत्त्वाची भूमिका राहते. जिल्हाध्यक्ष पदावर तेजराव थोरात २०१३-१४ पासून कार्यरत आहेत. त्यांनी ग्रामीण भाग पिंजून काढून कार्यकर्त्यांची फळी उभारली. मितभाषी स्वभावामुळे पक्षासह संघ परिवारात वरिष्ठ पातळीपर्यंत संपर्क असल्याचे बोलल्या जाते. ते सलग ६ वर्षांपासून या पदावर कार्यरत असल्याने त्यांच्या जागेवर नवीन पदाधिकाºयाची वर्णी लागणार असल्याची माहिती आहे. २०१५-१६ मध्ये पक्षाने किशोर मांगटे पाटील यांना महानगराध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली. स्पष्टवक्ता, रोखठोक भूमिक ा असलेल्या मांगटे पाटील यांनी शहरावर पकड निर्माण केल्याची चर्चा आहे. यंदा महानगराध्यक्ष पदासाठी अनेक पदाधिकारी इच्छुक असल्याने किशोर पाटील यांना पक्षाकडून दुसºयांदा संधी दिली जाते का, याकडे लक्ष लागले आहे.मुंबईत नेते, पदाधिकाºयांची बैठकदर तीन वर्षांनी पार पडणाºया जिल्हाध्यक्ष, महानगराध्यक्ष निवड प्रक्रि येसंदर्भात ८ जानेवारी रोजी पक्षाचे स्थानिक नेते, पदाधिकाºयांची प्रदेश स्तरावरील नेत्यांसोबत बैठक झाली. संघटनेवर पकड, प्रामाणिक व स्वच्छ चेहरा असलेल्या पदाधिकाºयांना संधी देण्यावर या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आहे.