- संतोष येलकरअकोला : केंद्र शासन पुरस्कृत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत दोन हेक्टरपर्यंत शेतजमीन असलेल्या अल्प व अत्यल्प भूधारक शेतकºयांच्या बँक खात्यात दरवर्षी सहा हजार रुपयांचे अर्थसाहाय्य जमा करण्यात येणार असून, या योजनेची राज्यात अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी अल्प व अत्यल्प भूधारक शेतकºयांच्या याद्या तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले असून, त्यामध्ये सामाईक शेती असलेल्या खातेदार शेतकºयांपैकी एका खातेदार शेतकºयास शेतजमिनीच्या क्षेत्रासंदर्भात स्वयंघोषणापत्र तालुकास्तरीय समितीकडे द्यावे लागणार आहे.प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत अल्प व अत्यल्प भूधारक प्रत्येक शेतकरी कुटुंबाला प्रतिवर्ष सहा हजार रुपये आर्थिक साहाय्य तीन टप्प्यात उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी शासनाच्या मार्गदर्शक सूचना आणि निकष राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात प्राप्त झाले आहेत. त्यानुसार प्रत्येक जिल्ह्यात पाच एकरपर्यंत शेती असलेल्या अल्प व अत्यल्प भूधारक शेतकºयांच्या याद्या तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. तहसील स्तरावर तालुकास्तरीय समित्यांकडून तपासणीनंतर करण्यात पात्र शेतकºयांच्या याद्या २२ ते २६ फेबु्रवारी दरम्यान राज्य आणि केंद्र शासनाच्या पोर्टलवर ‘अपलोड’ करण्यात येणार आहेत. त्यामध्ये पाच एकरापर्यंत शेती एकाच कुटुंबातील एकापेक्षा जास्त खातेदारांच्या नावे असल्यास, सात-बारावरील सामाईक खातेदार शेतकºयांपैकी एका खातेदार शेतकºयाला संबंधित तलाठी किंवा तालुकास्तरीय समितीकडे स्वयंघोषणापत्र सादर करावे लागणार आहे.स्वयंघोषणापत्रात अशी द्यावी लागणार माहिती!प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत सामाईक खातेदारांपैकी एका खातेदार शेतकºयाकडून स्वयंघोषणापत्र घेण्यात येत आहे. त्यामध्ये संबंधित खातेदार शेतकºयांचे नाव, गाव, वय, व्यवसाय, सात-बारानुसार सामाईक खाते क्रमांक, शेतजमिनीचे एकूण क्षेत्र, सहखातेदारांची संख्या, बँक खाते क्रमांक, आधार क्रमांक, मोबाइल क्रमांक इत्यादी प्रकारची माहिती संबंधित खातेदार शेतकºयांना स्वयंघोषणापत्रात द्यावी लागणार आहे.