अकाेला: राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त सृजन फाउंडेशनतर्फे मातृशक्ती स्वाभिमान प्रकल्पांतर्गत मलकापूरस्थित स्व. चिमनलालजी भरतीया जिव्हाळा वृद्ध सेवा आश्रमात कोविड विधवा व समाजातील गरजू भगिनींसाठी लघु व गृह उद्योग प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन करण्यात आले़ चरख्यावर हातमागाच्या कापड निर्मिती प्रशिक्षण व उद्योग साहित्य गरजू भगिनींसाठी उपलब्ध केले. लवकरच प्रशिक्षण व उद्योग प्रारंभ करण्यात येईल. अगरबत्ती निर्मिती प्रकल्पाचे उद्घाटनही याप्रसंगी करण्यात आले. प्रतिभावान मुलींसाठी निःशुल्क स्पर्धा परीक्षा अभ्यासिकेचा आश्रमात प्रारंभ केला. प्रकल्पासाठी मार्गदर्शक सदस्य अविनाश देशमुख, सृजन फाउंडेशनचे तथा युवा राष्ट्रचे अध्यक्ष डॉ. नीलेश पाटील, सचिव पल्लवी कुळकर्णी, अमोल डांगे, सविता अढाऊ, श्रीराम पालकर, दिनेश लोहोकार, शिवराज पाटील, राजू इटोले आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पल्लवी कुळकर्णी, संचालन श्रीराम पालकर यांनी केले़ आभार अविनाश देशमुख यांनी मानले. यावेळी डॉ. वैष्णवी खडसे, माजी महापौर तथा उद्योजिका उज्ज्वला देशमुख, भाग्यश्री मापारी, मनीषा भुसारी, ज्योती ढोरे, रेखा जाधव, श्रद्धा पुंडकर, चित्रा बापट, अलका वानखडे, ऐश्वर्या धारस्कर, माया इरतकर यांची उपस्थिती हाेती़ आगरकर विद्यालयाचे मुख्याध्यापक सतीश देशमुख, आनंद वानखडे, धनंजय मिश्रा यांनी विचार व्यक्त केले़
सृजन फाउंडेशनतर्फे गरजू भगिनींसाठी स्वयंरोजगार केंद्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 4:23 AM