अकोला : महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेच्यावतीने एसटी कामगारांच्या प्रलंबित वेतनासाठी शुक्रवारी राज्यभर आत्मक्लेश उपोषण करण्यात आले. या अनुषंगाने अकोला विभाग नियंत्रक यांचे कार्यालय समोर महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेचे सर्व पदाधिकारी यांनी एक दिवसीय आत्मक्लेश आंदोलन करून आपल्या मागण्या शासन तसेच प्रशासन दरबारी मांडल्या.राज्य सरकारचे प्रतिनिधी म्हणुन विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी उपोषण स्थळी हजेरी लावुन निवेदन स्विकारले. यावेळी त्यांनी राज्याचे परिवहनमंत्री अनिल परब यांच्याशी दुरध्वनीवरून संपर्क साधून एसटी कामगारांच्या वेतनाची माहिती घेतली. राज्य सरकार एसटी कामगारांबद्दल सकारात्मक असुन शासन स्तरावर एसटी कामगारांच्या वेतनासाठी उपाय योजना सुरू असुन लवकरच प्रलंबित वेतन अदा करण्यात येतील, असा शब्द मिटकरी यांनी राज्य सरकारचे प्रतिनिधी म्हणुन दिला. तसेच प्रशासन तर्फे विभाग नियंत्रक चेतना खिरवाडकर यांनी निवेदन स्वीकारले. याप्रसंगी संघटनेचे प्रादेशिक सचिव विजय साबळे, विभागीय अध्यक्ष कैलास नांदूरकर, विभागीय सचिव रूपम वाघमारे, विभागीय प्रसिधदी प्रमूख मनिष तिवारी, विभागीय कोषाध्यक्ष संध्या देशकर, मुख्यालय सचिव देवानंद पाठक, महिला आघाडी प्रमुख सविता नागवंशी व इतर सर्व विभागीय पदाधिकारी उपस्थित होते. आंदोलनस्थळी संघटनेचे कार्यकर्ते दीपक महाले, महेंद्र राठोड, प्रमोद गावंडे, अनिल राजपुत, राहुल पाठक, युवराज जाधव, रवी अढाऊ, प्रदीप सोनखासकर, सचिन हाताडकर व प्रेमकुमार राजकुवर उपस्थित होते.