अकोला: रेल्वे स्टेशन व बस स्टँड परिसरामध्ये असलेले दुकान निर्धारित किमतीपेक्षा जादा दराने खाद्यपदार्थ, पाणी व इतर वस्तूंची विक्री करीत असल्याच्या कारणावरून रेल्वे विभागाने मंगळवारी नऊ विक्रेत्यांविरुद्ध कारवाई केली. मध्य रेल्वे विभागाच्यावतीने अकोला आणि वाशिम रेल्वे स्टेशनवर विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. मोहिमेदरम्यान मंगळवारी रेल्वे विभागाच्या अधिकार्यांना रेल्वे स्टेशन परिसरात असलेले काही विक्रेते निर्धारित दरापेक्षा जादा दराने ग्राहकांना खाद्यपदार्थ, पाण्याच्या बाटल्या व इतर पदार्थांची विक्री करीत असल्याचे निदर्शनास आले. रेल्वे विभागाच्या अधिकार्यांनी नऊ विक्रेत्यांविरुद्ध कारवाई केली. त्यांचा व्यवसाय परवाना रद्द करण्याचा विचार रेल्वे विभाग करीत आहे.
जादा दराने विक्री; नऊ विक्रेत्यांविरुद्ध कारवाई
By admin | Published: February 10, 2016 2:20 AM