बुलडाणा : विधान परिषदेच्या अकोला-बुलडाणा-वाशिम स्थानिक स्वराज्य मतदारसंघातून शिवसेनेचे गोपीकिशन बाजोरिया यांनी विजय मिळवत राष्ट्रवादीचा पराभव केला. तीन जिल्ह्यांच्या या मतदारसंघात बुलडाण्यात सर्वाधिक मतदार असतानाही बुलडाण्याचे भूमिपुत्र असलेले राष्ट्रवादीचे उमेदवार रवींद्र सपकाळ यांना पक्षाची ह्यव्होट बँकह्णही कायम ठेवता आली नाही. संख्याबळात वरचढ असलेल्या राष्ट्रवादी आघाडीला शिवसेनेने चारीमुंड्या चित करून संख्याबळाचे गणित बदलविले आहे. अकोला, बुलडाणा व वाशिम या तिन्ही जिल्ह्यांपैकी सर्वाधिक ३८0 मतदार हे बुलडाणा जिल्ह्यात आहेत. त्यामध्येही काँग्रेस-राष्ट्रवादीचे वर्चस्व असून, ३८0 मतदारांमध्ये काँग्रेस आघाडीचे वर्चस्व आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका व नगरपंचायतींमध्ये सर्वत्र काँग्रेस-राष्ट्रवादीची एकत्रित सत्ता असल्यामुळे संख्याबळाच्या आधारावर सपकाळ यांनी बाजोरिया यांच्यासमोर तगडे आव्हान उभे केले होते. बुलडाण्याचे भूमिपुत्र असलेले सपकाळ हे बुलडाण्यात आघाडी घेतील, अशीच अपेक्षा सर्वांची होती. प्रत्यक्षात या निवडणुकीत प्रचंड घोडेबाजार झाल्याने ३८0 मतदारांपैकी अध्रेही मतदार त्यांच्या पाठीशी राहिले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. बुलडाण्यातूनच त्यांच्या ह्यव्होट बँकेह्णला सुरुंग लागल्यामुळे अकोला व वाशिममध्ये भरघोस मतदानाची शक्यताच नव्हती.बाजोरिया यांच्याविरोधात वातावरण असल्याचे चित्र या निवडणुकीच्या प्रारंभी तयार करण्यात आले होते. त्याचा फायदा घेण्यासाठी आघाडीकडून ह्यबहुजन चेहराह्ण हा शब्दप्रयोग करीत ह्यमराठा कार्डह्णही चालविण्याचा प्रयत्न झाला; मात्र या सर्वांवर बाजोरिया यांचे ह्यमॅनेजमेंट स्किलह्ण भारी पडले. गेल्या दोन निवडणुकींचा अनुभव त्यांच्या पाठीशी असल्यामुळे मतदारांना कसे प्रभावित करावे, याची नाळ त्यांना ठावूक होती. त्या तुलनेत सपकाळ हे नवखे ठरले. काँग्रेस व राष्ट्रवादीची आघाडी असली तरी या आघाडीधर्माचीही आठवण मतदार असलेल्या नेत्यांना राहिली नाही. त्यामुळे आघाडीची मते मोठय़ा प्रमाणात फुटली असल्याचे स्पष्ट झाले. त्याच्या उलट भाजपा-शिवसेना युती भक्कमपणे कायम राहिली, शिवाय काँग्रेस, राष्ट्रवादी, भारिप-बमसं या पक्षांमध्येही फूट पाडून अपक्षांना आपल्याकडे वळविण्यात बाजोरिया यशस्वी झाले.
सेनेने बदलविले संख्याबळाचे गणित
By admin | Published: December 31, 2015 2:40 AM