यासंदर्भात जनरल प्रॅक्टीशनर डॉक्टर्सची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस पोलिस अधिक्षक जी. श्रीधर , जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी मुकेश चव्हाण, प्रभारी मनपा आयुक्त पंकज जावळेकर, प्रांताधिकारी डॉ. निलेश अपार, मनपा वैद्यकीय अधिकारी डॉ. फारुख शेख तसेच अन्य अधिकारी व डॉक्टर्सच्या संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की, प्रशासनाने फिरते पथक तयार केले आहे. रुग्णांचे सिटी स्कॅन करुन घेऊन परस्पर रेमडीसेव्हियरचे उपचार करीत असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित डॉक्टर वर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी निक्षून सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन
अकोला - छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांचे प्रतिमापूजन करुन अभिवादन करण्यात आले. येथील लोकशाही सभागृहात प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी तथा उप जिल्हा निवडणूक अधिकारी मुकेश चव्हाण यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी- कर्मचारी सामाजिक अंतर राखून उपस्थित होते.