अकोला: आपल्या कार्यकुशलतेने विदर्भाचे नाव देश-विदेशात उज्जवल करणारे ज्येष्ठ कृषी शास्त्रज्ञ डॉ. चारूदत्त मायी यांची अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेवर राज्यपाल प्रतिनिधी म्हणून राज्याचे राज्यपाल तथा कुलपतींनी त्यांची निवड केली आहे. जागतिक हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर वैदर्भीय शेती शाश्वत आणि शेतकरी संपन्न होण्यासाठी कृषी विद्यापीठांची भूमिका अधिक प्रभावी करण्यासाठी शासन-शेतकरी-शास्त्रज्ञ यामधील दुवा म्हणून कार्यकारी परिषद सदस्य भूमिका बजावत असतात. डॉ मायी यांच्या रूपाने अतिशय अनुभवी, कर्तव्यतत्पर, दूरदृष्टी असणारा कृषी शास्त्रज्ञ कार्यकारी परिषदेवर लाभला ही सर्व शेतकरी, कृषी विद्यापीठ अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांच्या दृष्टीने आनंदाची बाब आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे शासन दरबारी प्रलंबित असलेले प्रश्न आता निकाली लागण्यास मदत होईल, असा आशावाद विद्यापीठ स्तरावर व्यक्त होत आहे. डॉ. चारूदत्त मायी यांचा जन्म १५ जुलै १९४६ रोजी बुलडाणा जिल्ह्यातील साखरखेर्डा येथे एका सामान्य शेतकरी कुटुंबात झाला. प्राथमिक शिक्षणापासूनच त्यांनी संपूर्ण शिक्षण गुणवत्तेसह पूर्ण केले. आचार्य पदवीमध्येसुद्धा सुवर्णपदक प्राप्त केल्याबद्दल भारतीय कृषी संशोधन परिषद, नवी दिल्लीद्वारा त्यांना गौरविण्यात आले. यामध्ये कुलगुरू, मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी; संचालक, केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर; कृषी आयुक्त, भारत सरकार, नवी दिल्ली इत्यादी महत्त्वाच्या पदांचा समावेश आहे. कृषी शास्त्रज्ञ भरती मंडळ (एएसआरबी), नवी दिल्ली या अतिशय महत्त्वाच्या संस्थेचे अध्यक्ष म्हणून डॉ. मायी यांनी २0११ सालापर्यंत काम बघितले आहे.
ज्येष्ठ कृषी शास्त्रज्ञ चारूदत्त मायी विद्यापीठ कार्यकारी परिषदेवर
By admin | Published: July 19, 2016 12:28 AM