यावेळी आमदार बाजोरिया यांनी, शिवस्मारक समितीचे कार्य उल्लेखनीय असल्याचे सांगत, त्यांनी शिवस्मारक समिती प्रस्तावित ईको पार्क या प्रकल्पाकरिता आमदार निधीतून दहा लाखांची मदत देण्याचे यावेळी जाहीर केले. तसेच १०१ विवाह लक्ष्मीनारायण मंदिरमध्ये लावण्याचा संकल्प त्यांनी यावेळी केला. शिव स्मारक समितीतर्फे ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला नगरसेवक मंगेश काळे व रवींद्र भन्साली, सविताताई जायले, माई गावंडे, संगीता केदार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेच्या पूजनाने नंतर वृक्षारोपण तसेच ओपन जिमचे लोकार्पण करण्यात आले. रघुनाथराव कोल्हे, विजयराव खंडाळकर, बाबासाहेब जोशी, सुरेंद्रसिंग ठाकूर, हसमुखजी गडिया, किशोरसिंग मोहता श्रीकृष्ण चांडक, साहेबराव चोरे, बन्सीधर डिडोळकर, डॉ. नंदकिशोर तोष्णीवाल, केशवराव गावंडे, विश्वनाथ शिरेकर, डॉ. वासुदेवराव शेकार, केशवराव गायकवाड, सुधाकरराव पसारकर, शालिग्राम पजई, विश्वासराव देशमुख, चंद्रकांत तराळ, गोविंदराव मांडवे आदी ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शरद कोकाटे यांनी तर आयोजनामागची भूमिका पंकज जायले यांनी विशद केली. नानासाहेब जायले यांच्या जीवनकार्याचा परिचय आर्किटेक्ट अनंत गावंडे यांनी दिला. कार्यक्रमाचे संचालन अनंत गावंडे व प्रभाकरराव रुमाले यांनी तर आभार चेतन ढोरे यांनी मानले. यावेळी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांची विधान परिषदेच्या प्रतोदपदी नियुक्ती झाल्याबद्दल शिवस्मारक समिती सहकारनगरतर्फे नागरी सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाला तुषार जायले, पवन महल्ले, अविभाऊ गावंडे, गोपीभाई चाकर, अनिल विखे, आनंद सुकळीकर, शेखर शेळके, विवेक ठोसर, मनीष सरडे, प्रदीप गावंडे, नंदकिशोर चतरकर, आनंद रावणे, संजय शिरेकर, बबलू पाटील विखे, शिवराज खंडाळकर, अमित ठाकरे, व्यंकटेश दांदळे, सोनू पानझाडे, श्रीकृष्ण बावस्कर, रोहित काळे, सचिन गाडेकर, राजू धमाले, राज जायले, शिव गावंडे, दीप जायले आदींची उपस्थिती होती.
फोटो: