याप्रसंगी मंडळाच्या वतीने सायकल चालविण्याविषयी महत्त्व पटवून देत, किमान आठवड्यातून दोन दिवस सायकल चालविणे व व्यायाम करणे, सकाळी फिरणे इत्यादी माहिती विलास वानखडे यांनी विशद केली. कोरोनामुळे सर्वांनी आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. सायकल चालविल्यामुळे शरीर प्रकृती उत्तम ठणठणीत राहते व अनेक फायदे होतात. प्रत्येकाने सायकल चालविणे अतिमहत्त्वाचे आहे, असे सायकलस्वार रमेश गावडे, मधुकर गोळंबे, भास्कर बन्सोड, चांदभाऊ मामू यांनी सांगितले.
सदर उपक्रमात, विलास वानखडे, गजानन वर्घट, जितू सिरसाट, संजय भेलोंडे, राकेश जोशी, रवी गोंडकार, प्रफुल्ल गुल्हाने, प्रशांत खिराडे, अक्षय वानखडे, संतोष तायडे सहभागी होते.
फोटो: