शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
2
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
3
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
4
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
5
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
6
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
7
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
8
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
9
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
10
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
11
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
12
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
13
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
14
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
15
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
16
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
17
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
18
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
19
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
20
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन

ज्येष्ठ सर्वोदयी रामसिंह राजपूत यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2020 5:37 PM

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे निस्सीम अनुयायी अ­ॅड. रामसिंह राजपूत यांचे ३१ मे रोजी सकाळी निधन झाले.

अकोला : ज्येष्ठ सर्वोदयी कार्यकर्ते, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे निस्सीम अनुयायी अ­ॅड. रामसिंह राजपूत यांचे ३१ मे रोजी सकाळी निधन झाले. ते ९१ वर्षांचे होते. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विचारांनी प्रेरित होऊन विनोबा भावे यांच्या भूदान चळवळीत सहभाग घेतला. एवढेच नव्हे तर त्यांनी स्वत:ची ५ एकर जमीनसुद्धा भूदान चळवळीत दान देऊन टाकली. त्यांच्या निधनाने सर्वोदयी परिवार, गुरुदेव सेवा मंडळ पोरके झाले आहे. १९ मे रोजी त्यांच्या पत्नी कमलाबाई यांचे निधन झाले होते. बारा दिवसानंतर त्यांनीही जगाचा निरोप घेतला.अ­ॅड. रामसिंह राजपूत हे मूळचे केळीवेळीचे राहणारे. लहानपणापासून वडिलांकडून त्यांच्यावर संस्कार झाले. महात्मा गांधी, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांचा त्यांच्या मनावर मोठा पगडा होता. अख्खं आयुष्य ते गांधी, विनोबा भावे यांच्या विचारांनुसार जगले. आयुष्याच्या अखेरपर्यंत त्यांनी खादी कापडाचाच वापर केला आणि इतरांनासुद्धा खादीचा वापर करण्याचा ते आग्रह करीत. गांधीजींनी स्वावलंबनाचा मंत्र दिला. शेतकऱ्यांनी पिकविलेल्या कापसातूनच स्वदेशी कापड निर्माण व्हावे, यासाठी सूतकताईची प्रेरणा दिली. या प्रेरणेतून गांधी जयंतीनिमित्त शहरात ५0 वर्षांपासून सूतकताईचा यज्ञ सुरू करण्यात आला होता. हा यज्ञ सुरू करण्यामागे अ­ॅड. राजपूत यांचा विचार होता. सर्वोदयी मंडळाच्या माध्यमातून सूतकताई यज्ञात अ­ॅड. रामसिंह राजपूत हिरिरीने सहभागी होत. सूतकताई करून त्यापासून बनविलेले खादीचे कापड ते वापरत असत. अ­ॅड. रामसिंह राजपूत हे सर्वोदयी मंडळाचे ज्येष्ठ मार्गदर्शक होते. महाराष्ट्र ग्रामदान मंडळाचे सचिव म्हणूनही त्यांनी अनेक वर्ष काम पाहिले. गुरुकुंज मोझरीसह विदर्भातील कुठेही राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा कार्यक्रम असो. अ­ॅड. राजपूत हे त्यात सहभाग व्हायचे. अकोल्यातील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सेवा समितीचे ते मार्गदर्शकच होते. राष्ट्रसंतांच्या जयंती, पुण्यतिथी कार्यक्रमात उत्साहाने ते सहभागी होत असत. गावांमध्ये फिरून स्वदेशी, खादी, निसर्गोपचार, ग्रामोद्योगाविषयी ते सातत्याने जनजागृती करीत. गतवर्षी त्यांनी १५0 निसर्गोपचार डॉक्टर तयार करण्याचा संकल्प केला होता. अशा ज्येष्ठ सर्वोदयी कार्यकर्त्याच्या अचानक निघून जाण्यामुळे एक मार्गदर्शक हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाDeathमृत्यू