अकोला : जिल्ह्यात कोविड १९ या विषाणू संसर्गाची स्थिती जाणून घेण्यासाठी ७ सप्टेंबरपासून जिल्ह्यातील विशिष्ट भागात सेरॉलॉजिकल सर्वेक्षण सुरू झाले आहे. पहिल्या दिवशी अकोला शहर, बाळापूर, हातरूण, गायगाव आणि वाडेगाव येथे सर्वेक्षणांतर्गत ४0२ नागरिकांचे रक्त नमुने घेण्यात आले.
जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर मीनाक्षी गजभिये, उप अधिष्ठाता डॉक्टर कुसुमाकर घोरपडे यांच्या मार्गदर्शनात जिल्ह्यात सीरो सर्वेक्षणाला सुरुवात झाली.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील जन औषध वैद्यकशास्त्र अंतर्गत सर्वेक्षणासाठी आवश्यक असलेले रक्त नमुने घेण्यात आले अकोला महानगर पालिका अंतर्गत शास्त्रीनगर, द्वारका कॉलनी, सुधीर कॉलनी येथून १00 व्यक्तींचे रक्त नमुने घेण्यात आले. तसेच बाळापूर तालुक्यातील बाळापुर, वाडेगाव ,हातरून,गोरेगाव या भागातील ३0२ नागरिकांचे रक्त नमुने घेण्यात आले.जन औषध वैद्यकीय शास्त्र अंतर्गत डॉक्टर संजय वाघ, डॉक्टर संपदा राजूरकर,डॉक्टर उमेश कवळ कार ,डॉक्टर हर्षल नेहते व डॉक्टरअश्विनी पाटेकर यांच्या नेतृत्वाखाली चार पथके तयार करण्यात आली आहे.रक्त नमुने गोळा करण्यासाठी संदीप जुमडे, मंगेश टाले, जगदीश वानखडे तसेच डॉ. दीपिका दौ ड,डॉ.तेजस्वी पुंगळे,डॉ. वैष्णवी बोरकर तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील पीजी डी एम एल टी च्या विद्यार्थ्यांनी विशेष सहकार्य केले . सदर मोहीम पुढील सात दिवस अकोला महानगर व उर्वरित तालुक्यात राबविण्यात येणार आहे.ग्रामीण भागात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत आहे. हातरुण प्राथमिक आरोग्य केंद्रात सोमवारी सेरो सर्वेक्षण अंतर्गत ४९ आणि गायगाव येथे ५१ नागरिकांचे रक्त नमुने तपासणीसाठी घेण्यात आले असल्याची माहिती प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. भुस्कुटे यांनी दिली. जिल्ह्यात प्रत्यक्ष ज्या तपासण्या झाल्या त्या व्यतिरिक्त किती लोकांपर्यंत कोविडचा संसर्ग पोहोचला, किती जणांना त्याची बाधा होऊन त्यांच्या शरीरात जैवप्रतिकारशक्ती तयार झाली, त्यातून समूहाची प्रतिकारशक्ती तयार झाली की नाही, यासंदर्भात या सर्वेक्षणातून माहिती मिळणार असल्याचे डॉ. भुस्कुटे यांनी सांगितले. नागरिकांचे सोमवारी रक्तनमुने घेऊन प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. बाळापूर येथे तहसीलदार पुरुषोत्तम भुसारी यांनी सर्वप्रथम रक्त नमुने तपासणी केली. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोला येथील पथकाने नागरिकांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी घेतले. यावेळी डॉ. अश्विनी पाटेकर, डॉ. संदीप चोपडे, डॉ. महेश चेडे, डॉ. पल्लवी वानखडे, डॉ. कल्याणी राऊत, डॉ. भुस्कुटे, आरोग्य पर्यवेक्षक गुलवाडे, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, आशा स्वयंसेविका, मदतनीस यावेळी उपस्थित होते. वाडेगाव येथेसुद्धा घरोघरी जाऊन सेरो सर्वेक्षण करण्यात आले आणि नागरिकांच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले.