---------------------------------------------------
बाजार समितीत आवक घटली
अकोला : शनिवार व रविवार कडक निर्बंध असल्याने शनिवारी बाजार समितीत शेतकऱ्यांनी कमी प्रमाणात माल आणला होता. त्यामुळे आवक घटली होती. बाजार समितीत जवळपास ५ हजार क्विंटल मालाची आवक झाली होती. सोमवारपासून पुन्हा आवक वाढण्याची शक्यता आहे.
-----------------------------------------------------
काटेपूर्णा धरणाच्या जलसाठ्यात घट
अकोला : वाढत्या उन्हामुळे जिल्ह्यातील जलसाठ्यात घट होत आहे. रविवारी काटेपूर्णा धरणात ३७.८३ टक्के जलसाठा होता. मागील वर्षीपेक्षा यंदा पाणीसाठा कमी आहे. पावसाला आणखी दोन महिने बाकी असल्याने पाणीसाठा टिकवून ठेवणे गरजेचे आहे.
----------------------------------------------------------
फळांचा गोडवा वाढतोय!
अकोला : यावर्षी पोषक हवामान असल्याने द्राक्ष, डाळिंब, सफरचंद, आंबे असे अनेक फळे चांगली झाली आहे. उन्हाच्या तडाख्याबरोबर बाजारात फळांची मागणी वाढली आहे. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासून आंब्याला मागणी वाढत आहे.