अकोला: मकर संक्रांत सणाच्या पृष्ठभूमीवर अकोल्याच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तिळाचे दर वधारले असून, मागच्या दोन महिन्यांत प्रतिक्ंिवटल ११,५०० रुपये असलेले हे दर आता १२,३७५ ते १३,५०० रुपयांवर पोहोचले आहेत. त्यामुळे मकर संक्र ांतमध्ये सामान्यांना जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. इतर धान्य, कडधान्याच्या दरात मात्र घट झाली.राज्यात तिळाचे क्षेत्र कमी झाले असून, उत्पादनही कमी आहे. अकोल्याच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मागील महिन्यात सरासरी एक क्ंिवटल तिळाची आवक होती. मकर संक्रांत सणाच्या पृष्ठभूमीवर आवक वाढली असून, आता ही सरासरी प्रतिदिन सहा क्ंिवटलवर पोहोचली आहे. मकर संक्रांतच्या पृष्ठभूमीवर शहरातील रस्त्याच्या कडेला लघू व्यावसायिकांनी दुकाने थाटली आहेत. या किरकोळ बाजारात तर घाऊक दरापेक्षा जादा दराने तिळाची विक्री सुरू आहे.इतर धान्य, कडधान्याचे दर मात्र कमी आहेत. शासकीय तूर खरेदी केंद्र सुरू च झाले नसल्याने शेतकऱ्यांना बाजारात प्रतिक्ंिवटल ४,४०० ते ४,८०० रुपयांपर्यंत दर दिले जात आहेत. तूर खरेदी करण्यासाठी यावर्षी महाराष्टÑ स्टेट को-आॅप फेडरेशनच्यावतीने प्रस्ताव मागविण्यात आले आहेत; परंतु बाजारात नवीन तुरीची आवक सुरू झाली असल्याने शासनाने प्रथम आॅनलाइन नोंदणी सुरू करण्याची गरज आहे, अन्यथा गतवर्षीप्रमाणे यावर्षीही लूट होण्याची शक्यता शेतकºयांनी व्यक्त केली आहे. अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सरासरी ११०० क्ंिवटल नवीन तुरीची आवक सुरू आहे. तुरीला यावर्षी ५,६७५ रुपये हमीदर जाहीर करण्यात आला आहे; पण बाजारातील दर ८०० ते १,२०० रुपयांनी कमी आहेत. हरभºयाचे दर आजमितीस सरासरी ४,१५० रुपये आहेत. हे दरही हमीपेक्षा कमी असून, आवक आता घटली आहे. या आठवड्यात दररोज सरासरी १८० क्ंिवटल आवक सुरू आहे. सोयाबीनच्या दरात या आठवड्यात वाढ झाली असून, चांगल्या पिवळ्या दाणेदार सोयाबीनला प्रतिक्ंिवटल दर ३,४७० रुपये देण्यात येत आहेत. सरासरी दर प्रतिक्ंिवटल ३,२५० रुपये आहेत. सोयाबीनची आवक सध्या सरासरी २,८०० क्ंिवटलपर्यंत आहे. मुगाचे दर सरासरी ५,१०० असून, आवक प्रचंड घटली आहे. चालू आठवड्यात बाजारात सरासरी ३० क्ंिवटल आवक होती. उडीद दराची स्थिती अशीच असून, सरासरी दर ४,२५० रुपये असून, आवक ९६ क्ंिवटल आहे.