लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: बोंडअळी अन्नदात्याचा शत्रू असून, शेतक-यांच्या आत्महत्येमागे हेदेखील एक कारण असल्याने या बोंडअळीचा नायनाट करण्यासाठी राज्यात जनजागृती, चळवळ उभारणार आहोत, त्यासाठी बोंडअळी नियंत्रणाचा गुजरात पॅटर्न राज्यात राबविणार असल्याचे प्रतिपादन कृषी व फलोत्पादन मंत्री पांडुरंग फुंडकर यांनी रविवारी येथे केले.अकोल्याचे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी (डॉ. पंदेकृवि) विद्यापीठ व परभणीच्या स्व. वसंतराव नाईक मराठवाडा (स्व. वनामकृवि) कृषी विद्यापीठाच्यावतीने अकोल्यातील कृषी विद्यापीठाच्या कमिटी सभागृहात बीटी कपाशीवरील गुलाबी बोंडअळीचे व्यवस्थापन या विषयावर आयोजित राज्यस्तरीय कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी अध्यक्षस्थानाहून फुंडकर बोलत होते. व्यासपीठावर महाराष्टÑ राज्य कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष डॉ. राम खर्चे, स्व. वनामकृविचे कुलगुरू डॉ. बी. वेंकटस्वरलू, डॉ. पंदेकृविचे कुलगुरू डॉ. व्ही. एम. भाले, संशोधन संचालक डॉ. व्ही.के. खर्चे, विस्तार शिक्षण संचालक डॉ. डी.एम. मानकर, वनामकृविचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. पी.जी. इंगोले यांच्यासह गुजरातच्या आनंद विद्यापीठाच्या कीटकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. पी. के. बारोड यांची प्रमुख उपस्थिती होती. बीटी कापसावरील बोंंडअळीमुळे शेतकºयांना अनेक कीटकनाशकांच्या फवारण्या कराव्या लागल्याने उत्पादन खर्च वाढला. उत्पन्न मात्र प्रचंड घटल्याने शेतकरी उद्ध्वस्त झाला. बोंडअळीच्या नियंत्रणासाठी आम्ही कृषी विद्यापीठ, कृषी विभाग, बियाणे, कीटकनाशके उत्पादक कंपन्यांच्या राज्यात बैठका घेऊन जनजागृती करण्याचा निर्णय घेतला आणि अमलातही आणला. भविष्यातही हे आव्हान असल्याने बोंडअळीचा समूळ नायनाट करण्याच्या दृष्टीने पावले उचलण्यात येत असून, गुजरात राज्यात ज्या पद्धतीने कापसावरील बोंडअळीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले, तोच कार्यक्रम राज्यात राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी लवकरच कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ, वरिष्ठ कृषी अधिकारी व मी स्वत: गुजरातचा दौरा करणार असून, तेथे राबविण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती घेणार आहोत. तेच गुजरात पॅटर्न राज्यात राबविण्यात येणार आहे. त्यासाठी प्रत्येक कापूस उत्पादक शेतकºयांना बोंडअळी नियंत्रणाची माहिती पुरविली जाईल. फरदड कापूस काढण्याचे व कमी कालावधीची जून ते डिसेंबरपर्यंतची पिके घेण्यासाठीचे शेतकºयांना मार्गदर्शन करणार आहोत. त्यासाठी कृषी विभागाची यंत्रणा सज्ज झाली असून, आजपासून ही चळवळ राबविणार असल्याचे फुंडकर म्हणाले. डॉ. खर्चे यांनी रोपवाटिकेत बीटी कपाशीची पेरणी करू न नंतर ती लागवड केल्यास शेतकºयांना फायदा होणार असल्याचे सांगितले. त्यासाठी कृषी विद्यापीठाने नव्याने संशोधन करावे, असा सल्ला दिला.डॉ. भाले यांनी मागील दहा वर्षांपासून आम्ही बोंडअळी व्यवस्थापनासाठी काम करीत आहोत; परंतु यावर्षी अचानक बोंडअळीने विशेषत: पूर्व मोसमी कापसावर हल्ला केला. त्यावरील उपाययोजनेसाठी कृषी विद्यापीठ सज्ज असल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. वेंकटस्वरलू यांनी बोंडअळीच्या प्रतिबंधासाठी मोठ्या प्रमाणात शेतात कामगंध सापळे लावण्याचा यावेळी सल्ला दिला. तसेच एकीकृत कीड व्यवस्थापन व वेळेवर फवारणी करणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. कार्यशाळेत परभणी व अकोल्याच्या कृषी विद्यापीठाच्या कीटकशास्त्र विभागाने तयार केलेली भित्तीपत्रके, घडपत्रिका, पुस्तकांचे प्रकाशन कृषी मंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले तसेच किडीची संपूर्ण माहिती असलेल्या मोबाइल अॅपचे उद्घाटनही कृषी मंत्र्यांनी केले. कार्यशाळेला राज्यातील कापूस उत्पादक जिल्ह्यातील सर्वच कृषी सहसंचालक, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, कृषी आयुक्तालयाचे वरिष्ठ अधिकारी, कृषी विद्यापीठाच्या वरिष्ठ शास्त्रज्ञांची उपस्थिती होती.
बोंडअळीचा गुजरात पॅटर्नकार्यशाळेत परभणी व अकोल्याच्या कृषी विद्यापीठाच्या कीटकशास्त्र विभागाने तयार केलेली भित्तीपत्रके, घडपत्रिका, पुस्तकांचे प्रकाशन कृषी मंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले तसेच किडीची संपूर्ण माहिती असलेल्या मोबाइल अॅपचे उद्घाटनही कृषी मंत्र्यांनी केले. कार्यशाळेला राज्यातील कापूस उत्पादक जिल्ह्यातील सर्वच कृषी सहसंचालक, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, कृषी आयुक्तालयाचे वरिष्ठ अधिकारी, कृषी विद्यापीठाच्या वरिष्ठ शास्त्रज्ञांची उपस्थिती होती.