लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : कर्जमाफी योजनेंतर्गत जिल्ह्यात थकबाकीदार शेतकर्यांचे ऑनलाइन अर्ज भरण्याचे काम जिल्ह्यातील सेतू केंद्रांवर सुरू आहे. अर्ज भरण्यात येणार्या अडचणींचे निरसन आणि सेतू केंद्रांविरुद्ध तक्रारींची तपासणी करण्यात येणार आहे. त्यानुषंगाने जिल्ह्यातील से तू केंद्रांच्या तपासणीसाठी तांत्रिक तज्ज्ञांची सात पथके गठित करण्या त येत असल्याचा आदेश अपर जिल्हाधिकारी राजेश खवले यांनी मंगळवारी दिला. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजनेंतर्गत जिल्ह्यातील थकबाकीदार शेतकर्यांचे ऑनलाइन अर्ज सामूहिक सेवा केंद्र (सीएससी) महाऑनलाइन केंद्र व आपले सरकार सेवा केंद्रांवर भरण्याचे काम सुरू आहे. यासंदर्भात जिल्हा संनियंत्रण समि तीच्या बैठकीत अपर जिल्हाधिकारी राजेंद्र खवले यांनी जिल्ह्यातील शेतकर्यांचे ऑनलाइन अर्ज भरण्याच्या कामाचा आढावा घेतला. कर्जमाफी योजनेत जिल्हय़ातील शेतकर्यांचे ऑनलाइन अर्ज भरण्याचे उद्दिष्ट जलदगतीने पूर्ण करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले. कर्जमाफीसाठी शेतकर्यांचे ऑनलाइन अर्ज भरताना महाऑनलाइन, सीएससी व आपले सरकार सेवा केंद्रांना येणार्या अडचणींचे निरसन आणि केंद्रांविरुद्ध तक्रारींची शहनिशा करण्याकरिता जिल्ह्यात तालुकानिहाय तांत्रिक तज्ज्ञांची सात त पासणी पथके गठित करण्यात येत असल्याचा आदेश अपर जिल्हाधिकारी राजेश खवले यांनी या बैठकीत दिला.
तपासणी पथकात असे आहेत तांत्रिक तज्ज्ञ!सेतू केंद्रांच्या तपासणीसाठी तांत्रिक तज्ज्ञांची तालुकानिहाय सात त पासणी पथके गठित करण्यात आली. त्यामध्ये अकोला तालुका- प्री ती शिंदे (सीएससी, जिल्हा व्यवस्थापक), बाळापूर तालुका - विशाल धोटे (अभियंता डीआयटी), बाश्रीटाकळी तालुका - प्रवीण गडपायले (प्रकल्प व्यवस्थापक, डीआयटी), अकोट तालुका - नीलेश सवलतकर (अभियंता डीआयटी), पातूर तालुका -हुसेन जावेद खान (अभियंता डीआयटी), मूर्तिजापूर तालुका - नवीन कावल (अभियंता डीआयटी) व तेल्हारा तालुका- सुरज खाडे (अभियंता डीआयटी ) इत्यादी तांत्रिक तज्ज्ञांचा समावेश आहे.
‘या’ मुद्यांची होणार तपासणी!तांत्रिक तज्ज्ञ नेमून दिलेल्या तालुक्यातील दररोज किमान पाच सेतू केंद्रांना भेट देऊन केंद्रावर शेतकर्यांचे ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी आवश्यक संच (सेटअप) आहे की नाही, केंद्रचालकाकडून शे तकर्यांना पैशाची मागणी केली जात आहे काय, केंद्रावर शेतकर्यांचे ऑनलाइन अर्ज भरण्याचे काम समाधानकारक आहे की नाही, इ त्यादी मुद्यांची तपासणी केली जाणार आहे. तपासणीचा दैनंदिन अहवाल सादर करण्याचे निर्देशही अपर जिल्हाधिकार्यांनी दिले आहेत.