एक अज्ञात आरोपी ७ गुरांच्या कत्तलीसाठी एका चारचाकी वाहनांना कोंबून वाहतूक करीत असल्याची माहिती रामदासपेठ पोलीस स्टेशनचे प्रभारी ठाणेदार तथा विशेष पथकाचे प्रमुख विलास पाटील यांना मिळाली. या माहितीवरून त्यांनी दगडीपूल परिसरातील एक चौक परिसर गाठून पाळत ठेवली. या गुरांची वाहतूक सुरू असताना त्यांनी सुरुवातीला सातही गुरे ताब्यात घेतली. त्यानंतर आरोपीचा पाठलाग करीत असताना तो ताजनापेठ परिसरातून फरार झाला; मात्र पोलिसांनी या सात गुरांना जीवनदान दिले. त्यानंतर, या सातही गुरांना गौरक्षण संस्थेत पाठविण्यात आले आहे. याप्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध रामदासपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सात लाख रुपये किमतीचे वाहन व एक लाख दहा हजार रुपये किमतीची गुरे असा एकूण आठ लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक मोनिका राऊत, शहर पोलीस उपअधीक्षक सचिन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाचे प्रमुख विलास पाटील, पीएसआय संदीप मडावी, शेख हसन, किशोर गवळी, श्रीकांत पातोंड, गजानन खेडकर, विशाल चव्हाण, अमोल शिरसाट व रामदासपेठ पोलिसांनी केली.
कत्तलीसाठी नेण्यात येत असलेल्या सात गुरांना जीवनदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 4:14 AM