अकोला : अकोल्यासह बुलडाणा जिल्ह्यातील विविध भागातील सात शेतकºयांना फवारणी करताना विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना शनिवार, २४ आॅगस्ट रोजी घडली. सातही शेतकºयांवर अकोल्यातील सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत.सध्या पिकांना फवारणी देण्याचे काम जोरात सुरू आहे. अशातच गत काही दिवसांपासून फवारणीतून शेतकºयांना विषबाधा झाल्याच्या घटना घडल्या आहेत. फवारणीतून विषबाधेचे हे सत्र सुरूच आहे. शनिवारीदेखील असाच थक्क करणारा प्रकार उघडकीस आला. अकोल्यातील सर्वोपचार रुग्णालयात विषबाधेच्या १३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यातील सात रुग्ण फवारणीदरम्यान विषबाधा झालेले आहेत. सर्वोपचार रुग्णालयात शनिवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास अकोल्यासह बुलडाणा जिल्ह्यातील विविध भागातून फवारणीतून विषबाधा झालेल्या शेतकºयांना दाखल करण्यात आले. या शेतकºयांवर सुरुवातीला अपघात कक्षात उपचार करण्यात आला. सध्या सर्वच शेतकºयांची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले आहे. यामध्ये अकोला जिल्ह्यातील गोरेगाव, मूर्तिजापूर, बोरगाव आणि अकोला तालुक्यातील चार शेतकºयांचा समावेश आहे, तर बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव, खामगाव, नांदुरा आणि संग्रामपूर तालुक्यातील पाच शेतकºयांचा समावेश आहे. विषबाधित शेतकºयांमध्ये अरुण गावंडे, प्रकाश आखरे, ओम ढोले, देवानंद तायडे, अमोल काकडे, गजानन अढाव आणि विजय अढाव या शेतकºयांचा समावेश आहे. सातही शेतकºयांवर सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत.वॉर्ड क्रमांक सहामध्ये उपचार सुरूअपघात कक्षात उपचारानंतर विषबाधित शेतकºयांना डॉक्टरांच्या निगराणीत ठेवण्यासाठी वॉर्ड क्रमांक सहामध्ये हलविण्यात आले. सध्या सर्वच विषबाधित शेतकºयांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.सहा रुग्ण विष प्राषण केलेले!फवारणीतून विषबाधा झालेल्या सात शेतकºयांव्यतिरिक्त शनिवारी आणखी सहा रुग्ण विष प्राषण केलेले दाखल झाले होते. हे रुग्णदेखील अकोल्यासह बुलडाणा जिल्ह्यातील असून, त्यांच्यावर अकोल्यातील सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत.