लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : राज्यात १ ते ७ जुलै २0१७ या वन महोत्सवाच्या काळात राबविण्यात आलेला शासनाचा महत्त्वाकांक्षी चार कोटी वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमांतर्गत अकोला जिल्हय़ात उद्दिष्टापेक्षा जास्त वृक्षांची लागवड झाली. जिल्हय़ात तब्बल ७ लाख ५८ हजार ६५२ वृक्षांची लागवड करण्यात आली.अकोला जिल्हय़ासाठी सुमारे ६ लाख ४0 हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. गेल्या सात दिवसांत वृक्ष लागवडीच्या उपक्रमाला चळवळीचे स्वरूप प्राप्त झाल्याने उद्दिष्टापेक्षा जास्त लागवड झाली. वन विभागाने ३ लाख ६७ हजार २५८ वृक्ष लागवड केले. इतर यंत्रणेने ३ लाख १७ हजार ९४९ झाडे लावली. ह्यमाय प्लान्टह्ण अँपवर ६ हजार ४४१ वृक्ष लागवडीची नोंद झाली आहे. रोप आपल्या दारी उपक्रमांतर्गत १८ हजार ५३ वृक्षांची लागवड झाली आहे. हॅलो फॉरेस्ट ( कॉल सेंटर) अंतर्गत वृक्षांची मागणी केलेल्या ४८ हजार ९५१ वृक्षांची लागवड झाली आहे. वृक्ष लागवडीच्या उपक्रमात शासकीय यंत्रणेसह सामान्य नागरिक, सामाजिक संस्थाही सहभागी झाल्या होत्या, असे वन विभागाने कळविले आहे.
अकोला जिल्हय़ात सात लाखांवर वृक्षांची लागवड
By admin | Published: July 09, 2017 9:20 AM