खामगाव : लग्नाहून परत येत असताना ऑटो उलटून झालेल्या अपघातात सात जण जखमी झाले. ही घटना शनिवारी वझर गावाजवळ घडली.तालुक्यातील वझर येथील श्यामराव देशमुख यांच्या घरी असलेल्या लग्ननिमित्ताने ३0 एप्रिल रोजी पिं पळखुटा ता.मोताळा येथील नातेवाईक आले होते. दरम्यान, लग्न झाल्यानंतर ऑटोने गावाकडे परत जात असताना चालकाचे ऑटोवरील नियंत्रण सुटल्याने वझर गावानजीक ऑटो उलटून अपघात झाला. या अ पघातात विशाल गणेश देशमुख (वय १७), वेणुबाई बुजाराव देशमुख (वय ४0), छकुबाई देशमुख (वय ६२), वामनराव गुलाबराव देशमुख (वय ६0), नारायण देशमुख (वय ६५), वंदनाबाई देशमुख (वय ४0), वैभव गजानन देशमुख (वय ४0) हे सात जण जखमी झाले. या जखमींना उपस्थितांनी त त्काळ खामगाव येथील सामान्य रुग्णालयात उपचारासाठी आणून भरती करण्यात आले. मात्र यामधील छकुबाई देशमुख, वामनराव गुलाबराव देशमुख, नारायण देशमुख, वंदनाबाई देशमुख, वैभव गजानन देशमुख हे पाच जण गंभीर जखमी असल्याने या पाच जणांवर प्रथमोपचार करून अकोला येथे हलविण्याचा सल्ला सामान्य रुग्णालयातील डॉक्टरांनी दिला. त्यामुळे उपरोक्त पाच जणांना पुढील उपचारासाठी अकोला येथे हलविण्यात आले असून, अकोला येथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सर्व जखमी हे अकोला जिल्ह्यामधील पिंपळखुटा या एकाच गावातील रहिवासी आहेत.
ऑटो उलटल्याने सात जण जखमी
By admin | Published: May 01, 2016 1:22 AM