जलकुंभाला विराेध;कारवाई का नाही?
रस्त्यालगत साहित्याची विक्री करणाऱ्या लघु व्यावसायिक, फेरीवाले, भाजीपाला विक्रेता यांच्या साहित्याची ताेडफाेड करणाऱ्या प्रशासनाने पाणीपुरवठ्यासारख्या अत्यावश्यक सेवेच्या मुद्यावर चूप्पी साधणे पसंत केले आहे़ सबळ कारण नसताना जलकुंभाला विराेध करणाऱ्या स्थानिक रहिवाशांच्या विराेधात मनपाने कारवाईचा बडगा का उगारला नाही,असा सवाल उपस्थित हाेत आहे.
मनपाच्या मिळमिळीत भूमिकेमुळे तांत्रिक पेच
मनपाची हद्दवाढ हाेण्यापूर्वी शहरात एकूण १३ जलकुंभ हाेते. त्यामध्ये ‘अमृत’ याेजने अंतर्गत आठ जलकुंभांची भर पडली असून हद्दवाढ क्षेत्रातील आठ जलकुंभ अशा एकूण २९ जलकुंभांद्वारे पाणीपुरवठा केला जाइल. ‘अमृत’मध्ये जलवाहिनीचे जाळे टाकण्याचे काम अंतिम टप्प्यात असून जुने शहरातील डाॅ.आंबेडकर मैदानालगत प्रस्तावित जलकुंभासाठी जलवाहिनीची ‘डिझाईन’तयार करण्यात आली हाेती. रहिवाशांच्या विराेधामुळे या ‘डिझाईन’मध्ये बदल करावा लागणार असून मनपाच्या मिळमिळीत भूमिकेमुळेच तांत्रिक पेच निर्माण झाल्याचे चित्र आहे़