लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: अल्पवयीन बालिकेवरील बलात्कारप्रकरणी दोषी आढळून आलेल्या रिसोड तालुक्यातील गणेशपूर येथील बाळू गणेश बोरकर या २५ वर्षीय आरोपीस ७ वर्षीय सश्रम कारावासाची शिक्षा येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश के.के. गौर यांनी मंगळवार १0 ऑक्टोबर रोजी सुनावली.रिसोड तालुक्यातील गणेशपूर येथे १४ मार्च २0१६ रोजी रात्री २ वाजताच्या सुमारास सदर घटना घडली होती. आरोपी बाळू बोरकर याने तालुक्यातीलच एका खेडेगावातून पीडित बालिकेस घरातून बोलावून गणेशपूर येथे आपल्या घरी पळवून आणले होते. या घटनेबाबत पीडित बालिकेच्या भावाने दुसर्या दिवशी सकाळी रिसोड पोलीस स्टेशनला फिर्याद दिली होती. रिसोड पोलिसांनी सदर प्रकरणाचा तपास करून बाळू गणेश बोरकर याची आई सुमनबाई गणेश बोरकर व सीताराम श्रावण गवई रा. लोणी फाटा, रिसोड या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. तपासानंतर प्रकरण न्यायालयात न्याय प्रविष्ट करण्यात आले होते. या प्रकरणी न्यायालयाने एकूण १५ साक्षीदार तपासले. साक्षी पुराव्यावरून आरोपी बाळू बोरकर हा दोषी आढळून आल्याने जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश गौर यांनी आरोपीस भादंविचे कलम ३७६ तसेच कलम ३ व ४ बालसंरक्षण कायद्यामध्ये सात वर्ष सश्रम कारावास व ५ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास पुन्हा तीन महिने सश्रम कारावासाची शिक्षा तसेच कलम ३६३ भादंविमध्ये तीन महिने सश्रम कारावास व तीन हजार रुपये दंड, दंड न भरल्यास पुन्हा तीन महिने सश्रम कारावास, अशी शिक्षा ठोठावली. सदर दोन्ही शिक्षा आरोपीस एकत्रित भोगावयाच्या आहेत. सबळ पुराव्याअभावी आरोपी सुमनबाई बोरकर व सीताराम गवई या दोघांना न्यायालयाने निर्दोष सोडले. सरकार पक्षातर्फे सहायक सरकारी अभियोक्ता पी.एस. ढोबळे यांनी बाजू मांडली.
बलात्कारप्रकरणी आरोपीस सात वर्षांचा कारावास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2017 1:51 AM
वाशिम: अल्पवयीन बालिकेवरील बलात्कारप्रकरणी दोषी आढळून आलेल्या रिसोड तालुक्यातील गणेशपूर येथील बाळू गणेश बोरकर या २५ वर्षीय आरोपीस ७ वर्षीय सश्रम कारावासाची शिक्षा येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश के.के. गौर यांनी मंगळवार १0 ऑक्टोबर रोजी सुनावली.
ठळक मुद्देअतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल गणेशपूर येथील घटना