अकोला : जिल्ह्यात सातव्या आर्थिक गणनेचे काम सुरू करण्यात आले असून, जनजागृती करून आर्थिक गणनेच्या कामाची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी मंगळवारी जिल्हास्तरीय समन्वय समितीच्या बैठकीत केले.सातव्या आर्थिक गणनेची अंमलबजावणी करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय समन्वय समितीची बैठक जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात आयोजित करण्यात आली होती. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, जिल्हा नियोजन अधिकारी ज्ञानेश्वर आंबेकर, जिल्हा सांख्यिकी कार्यालयाचे संशोधन अधिकारी रामचंद्र जायभाये, नगर प्रशासन अधिकारी सुप्रिया टवलारे, राष्ट्रीय नमुना पाहणी संघटनेचे क्षेत्रीय कार्य अधिकारी एन. एस. मुळे, व्ही. सेहगल, कॉमन सर्व्हिस सेंटरचे नीलेश इंगळे, महानगरपालिकेचे अनिल बिडवे उपस्थित होते. सातव्या अर्थिक गणनेत जिल्ह्यातील सर्व उद्योग, व्यवसाय व सेवा इत्यादींची गणना करण्याचे काम जिल्ह्यात सुरू करण्यात आले आहे. आर्थिक गणनेच्या कामाची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले. तसेच आर्थिक गणनेच्या कामात कॉमन सर्व्हिस सेंटर्सला येणाºया अडचणी जिल्हाधिकाºयांनी यावेळी जाणून घेतल्या. या बैठकीला जिल्ह्यातील नगरपालिकांचे मुख्याधिकारी, जिल्हा उद्योग केंद्राचे अधिकारी, महाविद्यालयांचे सांख्यिकी व अर्थशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख, पोलीस विभागाचे अधिकारी उपस्थित होते.घरोघरी, उद्योगांना भेटी देऊन प्रगणक करणार गणना!सातव्या आर्थिक गणनेत जिल्ह्यातील उद्योग, व्यवसाय व सेवा इत्यादींची गणना करण्यात येणार आहे. त्यासाठी प्रगणक घरोघरी, उद्योगांना व व्यवसायाच्या ठिकाणी भेटी देऊन गणना करणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी प्रगणकांना सहकार्य करून आर्थिक गणनेची माहिती देण्याचे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.