जिल्ह्यात दररोज दोन ते तीन गंभीर रुग्ण दाखल
गंभीर रुग्णांची संख्या कमी झाली असली, तरी दररोज दोन ते तीन गंभीर रुग्ण रुग्णालयात दाखल होत असल्याची माहिती वैद्यकीय तज्ज्ञांनी दिली आहे, परंतु वेळेवर उपचार मिळाल्याने रुग्णांच्या प्रकृतीमध्ये सुधारणाही होत आहे.
दररोज दीडशे ऑक्सिजन सिलिंडरचा वापर
कोविड गंभीर रुग्णांच्या संख्येत घट झाल्याने ऑक्सिजनचीही मागणी कमी झाली आहे. सप्टेंबर महिन्यात दररोज ५०० पेक्षा जास्त ऑक्सिजन सिलिंडरची आवश्यकता भासत होती. सद्यस्थितीत जवळपास दीडशे ऑक्सिजन सिलिंडरची आवश्यकता भासत आहे.
कोविड रुग्ण अर्ली डिटेक्शन होत असल्याने रुग्णांना वेळेत उपचार मिळत आहे. त्यामुळे रुग्णांमध्ये वेळेत सुधारणा होत असून ऑक्सिजनचा वापरही कमी झाला आहे.
- डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा शल्यचिकित्सक,अकोला