गावात मेनरोड तसेच सर्व्हिस गल्ल्यांमध्ये पिवळी माती टाकून पाणी वाहून जाणाऱ्या नाल्या पूर्ण बंद केल्या आहेत. मागील महिन्यात शेतातील पिवळी माती आणून मेनरोडवरील नाल्या बुजल्या आहेत. त्यामुळे पावसाचे पाणी व सांडपाणी मेन चौकात हनुमान मंदिरासमोर साचले आहे. याबाबतची सदर तक्रार ग्रामसेवक अनंत वावगे, सरपंच, सदस्यांकडे केली आहे. परंतु त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. आता पहिल्याच पावसात गावात गटारी साचल्या आहेत. त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. मागीलवर्षी सांडपाण्यावरून शेजारी राहणाऱ्या रहिवाशांमध्ये वादसुद्धा झाला होता. ग्रामपंचायत प्रशासनाने नाल्यांची स्वच्छता करून खोलगट भागांमध्ये मुरूम टाकण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
फोटो:
ग्रामस्थांनी दिला आंदोलनाचा इशारा
गावामध्ये पावसामुळे गटारी साचल्या आहेत. डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने तातडीने गावातील रोडवरील माती उचलून, नाल्यांची सफाई करावी आणि गावामध्ये चिखल साचू नये. यासाठी मुरूम टाकावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. अन्यथा उपोषण, धरणे आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.