अकोला: रेल्वे स्टेशनसमोरील हॉटेल ब्ल्यू डायमंड आणि माउंट कारमेल शाळेला लागून असलेल्या रसोई फॅमिली रेस्टॉरंट या दोन्ही हॉटेलमध्ये सेक्स रॅकेट चालविण्यात येत असताना पोलिसांनी छापेमारी करून पर्दाफाश केला. त्यानंतर या दोन्ही हॉटेलचे अनेक भयंकर प्रताप समोर येत असून, शहरासह ग्रामीण भागातील तरुण-तरुणींना दोन हजार रुपये तासाप्रमाणे या ठिकाणी रूम उपलब्ध करून देण्यात येत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. हॉटेल मालकाच्या संमतीने हा प्रकार सुरू असताना पोलिसांनी मात्र अद्यापही खऱ्या मुख्य सूत्रधारांना आरोपी केले नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
ब्ल्यू डायमंड हॉटेलचा भाडेकरू प्रशांत जावरकर, सनी नवले हे दोघे जण हॉटेल ब्ल्यू डायमंडसह रसोई फॅमिली रेस्टॉरंट येथे तरुण-तरुणींना खास सुविधा असलेल्या रूम दोन हजार रुपये तासाप्रमाणे उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे खात्रीलायक सूत्रांनी सांगितले. हे दोघे जण या दोन्ही हॉटेलमध्ये ग्राहकांच्या माध्यमातून देहविक्रय अड्डा चालवित असताना स्थानिक गुन्हे शाखेने शहर पोलीस उपअधीक्षक यांच्या मार्गदर्शनात या दोन्ही हॉटेलवर सुरू असलेल्या देहविक्रय अड्ड्यावर छापा टाकला होता. तरुण-तरुणी पळून जाण्यात यशस्वी झाल्या. त्यानंतर पोलिसांनी या ठिकाणावरून ब्ल्यू डायमंड हॉटेलचा चालक सनी नवले व भाडेकरू प्रशांत जावरकर या दोघांविरुद्ध रामदासपेठ पोलीस ठाण्यात पिटा अॅक्टनुसार गुन्हा दाखल केला; मात्र सदर अड्डा चालविण्यासाठी रूमच्या सुविधांसह पोलिसांनाही मॅनेज करण्याची भाषा बोलणाºया हॉटेल रसोईचा मुख्य सूत्रधार अद्यापही मोकाट असल्याचे वास्तव आहे.
देहव्यापाराचे पाळेमुळे खोदण्याची गरज!शहरासह जिल्ह्यात सुरू असलेल्या देहव्यापाऱ्यांच्या दहा ते ११ अड्ड्यांवर पोलिसांनी आतापर्यंत कारवाई केली आहे; मात्र या प्रकरणातील खरे सूत्रधार अद्यापही मोकाट असल्याचे वास्तव आहे. यामध्ये हॉटेल रसोई तसेच ब्ल्यू डायमंड या दोन ठिकाणी तर तरुणींसह लहान मुलींनाही खोली देण्यात येत असल्याची माहिती आहे. त्यामुळे या ठिकाणी हा व्यवसाय चालविणाºया तसेच पैशाच्या बळावर प्रत्येकाला दाबणाºया मुख्य सूत्रधाराचा छडा लावण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.येवता येथील महिलांना समजपत्रयेवता येथील देहव्यापार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून दोन महिलांना ताब्यात घेतल्याची माहिती होती; मात्र दोन्ही महिलांना पोलिसांनी समजपत्र देऊन सोडल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे, येवता येथे यापूर्वीही कारवाई केल्यानंतरही हा अड्डा सुरूच असल्याचे वास्तव आहे. याकडे पोलीस अधीक्षक अमोघ गावकर यांनीही लक्ष घातल्यास मोठे रॅकेटच बाहेर येण्याची शक्यता आहे.