शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांच्या विरोधात निवडणूक लढविली, तोच उमेदवार शिंदे गटात जाणार; लता शिंदेंच्या उपस्थितीत घोषणा
2
IND vs AUS: पर्थवर इतिहास रचण्यात टीम इंडिया 'यशस्वी'! ऑस्ट्रेलियाच्या बालेकिल्ल्यात 'विराट' विजय
3
Maharashtra Assembly Election Result 2024: देवेंद्र फडणवीस होणार राज्याचे मुख्यमंत्री?; आजच शिक्कामोर्तब होण्याची शक्यता
4
'जानी दुश्मन'चा खेळ खल्लास! बुमराह-विराट यांच्यात दिसला 'मिले सुर मेरा तुम्हारा सीन' (VIDEO)
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: ही काय भानगड! ९५ मतदारसंघात मतांमध्ये तफावत; मतदान अन् EVM ची मते कुठे जुळली नाहीत?
6
५० खोके एकदम ओके...राज्यात गाजलेली घोषणा पहिल्यांदा देणारा आमदारही निवडणुकीत पराभूत
7
"...तर याचा करेक्ट कार्यक्रम वाजला असता"; रोहित पवारांच्या 'त्या' विधानावर अमोल मिटकरी भडकले
8
बँक खातेदारांना आता ४ नॉमिनी व्यक्तींची नावं द्यावी लागणार, सरकार लवकरच कायदा आणणार!
9
NTPC चा शेअर तुम्हाला अलॉट झालाय का? कसं चेक कराल, पाहा स्टेप-बाय-स्टेप प्रोसिजर
10
'कांतारा'च्या कलाकारांसोबत मोठी दुर्घटना! शूटिंगवरुन परतताना बस पलटी, अनेक जण जखमी
11
Sambhal Violence : संभलमध्ये हिंसाचार भडकावल्याप्रकरणी सपा खासदार आणि आमदाराच्या मुलावर गुन्हा दाखल, पोलिसांकडून अनेक ठिकाणी  छापेमारी
12
"ज्यांना जनतेने ८० वेळा नाकारलं, ते रोखताहेत संसदेचं कामकाज’’, पंतप्रधान मोदींची टीका   
13
'हास्यजत्रा' फेम प्रियदर्शनी इंदलकरचं अनेक वर्षांपासूनचं स्वप्न झालं पूर्ण! अभिनेत्री म्हणाली- "लंडनमध्ये जाऊन..."
14
"नियोजित कट होता, त्यात माझा बळी गेला"; अजित पवारांवर राम शिंदेंचा गंभीर आरोप
15
४ जणांचा मृत्यू , २० हून अधिक पोलीस जखमी… संभलमध्ये बाहेरच्या लोकांना प्रवेश नाही; काय आहे प्रकरण?
16
कोण किशोर कुमार? आलियाने पहिल्याच भेटीत विचारलेला प्रश्न; रणबीर कपूरचा खुलासा
17
नाना पटोलेंनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची चर्चा; काँग्रेसकडून वृत्ताचे खंडन
18
थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर...; प्रीतीसंगमावर अजित पवार-रोहित पवारांची भेट!
19
Raj Thackeray MNS: राज ठाकरे यांचे इंजिन धोक्यात, पक्षाची मान्यता जाणार का?
20
RIL share price: रिलायन्स इंडस्ट्रीजवर ब्रोकरेज बुलिश, रिस्क रिवॉर्ड अनुकूल; दिला खरेदीचा सल्ला

प्रेमाच्या जाळ्यात ओढून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2020 2:24 PM

नागपूर येथे राहणाऱ्या १७ वर्षीय मुलाने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले आणि तिला लग्नाचे आमिष दाखविले.

अकोला: नागपूर येथील एका १७ वर्षीय मुलाने अकोल्यातील १७ वर्षीय मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिला नागपूरला पळवून नेत, तिच्यावर सातत्याने लैंगिक अत्याचार केला. यातून मुलीला दोन महिन्यांची गर्भधारणा झाली. या प्रकरणात रामदासपेठ पोलिसांनी सुरुवातीला अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. गुरुवारी पोलिसांनी त्या अल्पवयीन मुलाविरुद्ध लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला.मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांची १७ वर्षीय मुलगी त्यांच्याकडे राहते. ती तिच्या आईकडे नागपूरला गेल्यावर नागपूर येथे राहणाऱ्या १७ वर्षीय मुलाने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले आणि तिला लग्नाचे आमिष दाखविले. मुलगी अकोल्यात आल्यानंतर काही दिवसांनी हा मुलगासुद्धा अकोल्यात आला. त्याने मुलीला फूस लावून नागपूरला पळवून नेले. या प्रकरणात रामदासपेठ पोलिसांनी त्याविरुद्ध भादंवि कलम ३६३, ३६६ नुसार गुन्हा दाखल केला होता. त्या मुलाने नागपूर, अकोला येथे अनेकदा मुलीचे लैंगिक शोषण केल्याचे समोर आले. पोलिसांनी मुलीची वैद्यकीय तपासणी केली असता, तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे आणि मुलीला गर्भधारणा झाल्याचे स्पष्ट झाले. रामदासपेठ पोलिसांनी नागपूर येथून त्या मुलाला ताब्यात घेतले आहे. शुक्रवारी त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात येईल. ही कारवाई ठाणेदार मुकुंद ठाकरे यांच्या मार्गदर्शनात पीएसआय संगीता रंधे, पीएसआय मडावी, पोलीस कर्मचारी संदीप तांदुळकर व राजेश इंगळे यांनी केली. (प्रतिनिधी)

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारी