अकोला : घरकाम करणाऱ्या महिलेला (४२) लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार करणाºया आरोपीविरुद्ध रविवारी खदान पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. महिलेच्या तक्रारीनुसार, ती महिला २००३ मध्ये नातेवाइकाच्या घरी मुलासह लग्नाला आली असता, तेथे आरोपी सतीश रामनाथ मौर्य भेटला. या ठिकाणी त्याने महिलेला लग्नाची मागणी घातली. लग्न आटोपल्यावर तक्रारकर्ता महिला आईच्या घरी परत गेली. दरम्यान, आरोपीने वारंवार फोन करून लग्न नाही केल्यास आत्महत्या करणार असल्याची धमकी दिल्याचे महिलेने म्हटले. त्यानंतर मे २००५ मध्ये आरोपीने तक्रारकर्त्या महिलेच्या घरी जाऊन लग्नाचे आश्वासन दिले व नंतर दत्त कॉलनी येथील मंदिरात महिलेशी लग्न केले; मात्र आरोपीचे वडील रामनाथ यांचा त्याला विरोध होता, त्यामुळे तक्रारकर्त्या महिलेला घरी परत पाठविण्यात आले. महिलेला खोटे आश्वासन देऊन अश्लील शिवीगाळ करून मारण्याच्या धमक्या देत असल्याचा आरोप तक्रारकर्त्या महिलेने केला. तक्रारकर्त्या महिलेने आरोपीचा मोबाईल तपासल्यावर त्याचे दुसरे लग्न झाले असून, त्याला दोन मुले असल्याची माहिती समोर आली. गत दोन वर्षांपासून तक्रारकर्ता महिला आरोपी सतीशपासून वेगळी आहे. अशातच २५ डिसेंबर रोजी आरोपी सतीश तक्रारकर्त्या महिलेच्या घरी गेला त्यावेळी त्यांने अश्लील चाळे केले. या प्रकाराची तक्रार महिलेने पोलिसात केली.
लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2019 10:35 AM