शहरं
Join us  
Trending Stories
1
शेवटच्या क्षणी काँग्रेसचा 'यू-टर्न'; उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराऐवजी अपक्षांना जाहीर पाठिंबा
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : निवडणुकीदिवशीच सोलापुरात ठाकरे गटाला धक्का! सुशीलकुमार शिंदेंचा अपक्ष उमेदवाराला पाठिंबा
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात सहकुटुंब बजावला मतदानाचा अधिकार
4
Vidhan Sabha 2024: महिला उमेदवारांचे त्रिशतक; आतापर्यंतचा उच्चांक!  
5
RBI गव्हर्नर शक्तिकांत दास यांचा डीपफेक व्हिडीओ व्हायरल; रिझर्व्ह बँकेनं नागरिकांना केलं सावध, म्हणाले...
6
शिंदेंच्या शिवसेनेकडून बनावट पत्र, राज ठाकरे संतापले; "वरळीकर मतदार सूज्ञ..." 
7
चंदा कोचर यांच्याविरोधात कारवाई करू नका, उच्च न्यायालयाचे एसएफआयओला निर्देश 
8
Sharad Pawar: सुप्रिया सुळेंवर मतदानाच्या आदल्या दिवशी गंभीर आरोप; शरद पवारांनी एका वाक्यात विषय संपवला!
9
विधानसभा निवडणुकीत 'आप' कोणाला तिकीट देणार? अरविंद केजरीवालांकडून मोठा खुलासा
10
सदा सरवणकरांच्या कोटवर दिसला उलटा 'धनुष्यबाण'; मनसेच्या अमित ठाकरेंनी केला सरळ
11
Jio New Recharge: केवळ इतक्या रुपयांमध्ये मिळणार वर्षभरासाठी अनलिमिटेड 5G डेटा; पाहा डिटेल्स
12
"गुंडगिरी खपवून घेणार नाही, २ तासांचा वेळ, नाहीतर..."; केंद्रीय मंत्री अनुप्रिया पटेल संतापल्या
13
कंगना रणौतने चक्क आर्यन खानचं केलं कौतुक; म्हणाली, "फिल्मी कुटुंबातून येऊनही..."
14
Parali Vidhan Sabha Election 2024: परळीत गैरप्रकार, कॅमेरे बंद ठेवले; महिलांनी भितीच्या वातावरणात केले मतदान
15
२१३ कोटींच्या दंडाला  ‘मेटा’ देणार आव्हान; स्पर्धाविरोधी कृत्याबाबत आयोगाचा ठपका
16
Pune Vidhan Sabha Election 2024 : जिल्ह्यात पहिल्या दोन तासात ५.५३ टक्के मतदान, सर्वाधिक ७.४४ टक्के मतदानाची कसब्यात नोंद
17
पनवेल रुग्णालयात नवजात बालकाचा मृत्यू; आरोग्य व्यवस्थेच्या निष्क्रियतेचा आणखी एक बळी
18
IND vs SA 4th T20: भारताचा राग अंपायरवर काढायला गेला, ICC चांगलाच दणका दिला!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात अनेक ठिकाणी 'ईव्हीएम' पडले बंद, मतदारांचा खोळंबा, केंद्राबाहेर गर्दी
20
"प्रत्येकीला ३००० द्यायचेत ना?" विनोद तावडे प्रकरणावरुन आस्ताद काळेची टिप्पणी

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; मुलगी गर्भवती!

By admin | Published: July 04, 2017 2:41 AM

रिसोड तालुक्यातील घटना: स्त्री रुग्णालयात गर्भपातासाठी आल्याने घटना उघडकीस

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: युवकाने अल्पवयीन मुलीवर बळजबरीने लैंगिक अत्याचार केल्याने मुलीला गर्भधारणा झाल्याची घटना सोमवारी दुपारी जिल्हा स्त्री रुग्णालयात उघडकीस आली. घटना रिसोड तालुक्यात २६ फेब्रुवारी रोजी घडली. याप्रकरणी रामदासपेठ पोलिसांनी सोमवारी सायंकाळी आरोपीसह मुलीच्या मैत्रिणीवर गुन्हा दाखल केला. सोमवारी दुपारी रिसोड तालुक्यातील एका गावात राहणारी १६ वर्षीय मुलगी गर्भपात करण्यासाठी अकोल्यातील जिल्हा स्त्री रुग्णालयात आली. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर गर्भलिंग निदान कायद्यानुसार पाच महिन्यांचा गर्भ काढता येत नसल्याचे मुलगी व तिच्या कुटुंबीयांना सांगितले आणि घटनेची माहिती घेतली. स्त्री रुग्णालयाने मुलीला तक्रार देण्यास रामदासपेठ पोलीस ठाण्यात पाठविले. मुलीने दिलेल्या तक्रारीनुसार ती दहावीत शिकते. तिची मैत्रीण वर्षा लक्ष्मण खांदळे हिच्या ओळखीतील विश्वजित सुखदेव जुमडे (२१) याच्यासोबत तिची भेट झाली. विश्वजित जुमडे हा शाळा परिसरात येऊन पीडित मुलीसोबत बोलू लागला. संपर्क वाढला. २६ फेब्रुवारी २0१७ रोजी मैत्रीण वर्षा खांदळे ही तिच्या घरी आली. माझ्या घरी कोणी नसल्याचे सांगून तिने पीडित मुलीला तिच्या घरी नेले. या ठिकाणी आधीपासूनच विश्वजित जुमडे हजर होता. त्याने घरातील स्वयंपाक खोलीत नेल्यावर वर्षा खांदळे ही घराबाहेर गेली. यावेळी विश्वजित याने बळजबरीने मुलीवर लैंगिक अत्याचार केला. यातून मुलीला गर्भधारणा झाली. समाजात बदनामी होईल या भीतीने मुलीने व तिच्या कुटुंबीयांनी ही घटना कोणालाच सांगितली नाही; परंतु मुलीचा गर्भपात करण्यासाठी अकोल्यातील स्त्री रुग्णालयात आल्याने ही घटना उघडकीस आली. मुलीच्या तक्रारीनुसार रामदासपेठ पोलिसांनी विश्वजित जुमडे, वर्षा खांदळे यांच्याविरुद्ध भादंवि कलम ३७६(३४), बाललैंगिक संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल केला.